Merry Christmas : मेरी ख्रिसमस ! प्रियजनांना द्या अनोख्या शुभेच्छा, पाठवा हे विशेष मेसेज !
Christmas Wishes and Greetings : ख्रिसमसचा सण येताना फक्त आनंद घेऊन येत नाही, तर थंडीच्या ऋतूतील आणि वर्षाअखेरीस या सणामुळे कुटुंबीय एकमेकांशी पुन्हा जोडले जातात. या खास सणाच्या दिवशी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींना छान संदेश पाठवून तुम्ही हा सण आणखी खास करू शकता.
डिसेंबर महीना उजाडताच सगळ्यांनाच ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेशनचे वेध लागतात. ख्रिसमसची उत्सुकता सर्वांनाच, विशेषत:लहान मुलांना जास्त असते. रंगीबेरंगी गिफ्ट्स, सजवलेला ख्रिसमस टी, केक, याची रेलचेल बरीच असते. सध्या भारतासह जगभरात ख्रिसमससह नववर्षाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक जण आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसह ख्रिसमस साजरा करून नवीन वर्षाच सेलिब्रेशन करतात. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक गोष्टींचे आयोजन करतात आणि या खास दिवशी ते त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना भेटायला जातात आणि त्यांना भेटवस्तू देतात. इतकंच नाही तर हा खास दिवस अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण आपले नातेवाईक आणि मित्रांसोबत फिरायला जायचा प्लानही आखतात. पण ज्यांना कामामुळे किंवा इतर व्यापांमुळे, काही कारणामुळे आपल्या जवळच्या लोकांची भेट घेता येत नाही, ते त्यांना छान शुभेच्छा संदेश अर्थात मेसेजेस पाठवतात.
नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास मेसेजेस आहेत, तुम्हीही घ्या जाणून…
1) प्रेमाची भेट, शांतीची भेट, आनंदाचा खजिना हे सर्व तुमच्यासाठी खास ख्रिसमच्या शुभेच्छा घेऊन आलं आहे.
2) ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा. ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
3) यंदाचा ख्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
4) स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.. Merry Christmas!
5) प्रत्येकाच्या हृदयात सर्वांसाठी प्रेम नांद दे, प्रत्येक दिवस हजारो आनंद घेऊन येवो, या आशेने आपण सर्व दु:ख विसरू या, आपण सर्वांनी नाताळचे स्वागत करूया. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
6) तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..
7) ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस…
8) देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.
9) वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
10) तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
11) माझ्याकडून आपणांस व आपल्या गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
12) होउदे तुमच्यावर सुखाची उधळण! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!