Health | अधिकचे ‘मीठ’ शरीरासाठी घातक, रक्तदाब-हृदयविकाराच्या समस्या उद्भवण्याची शक्यता!

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि हृदयविकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Health | अधिकचे ‘मीठ’ शरीरासाठी घातक, रक्तदाब-हृदयविकाराच्या समस्या उद्भवण्याची शक्यता!
अशा प्रकारे करा मिठाचा वापर, त्वचेची समस्या होईल दूर
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 6:01 PM

मुंबई : आपण सगळेच आपल्या अन्नात मीठ (Salt) वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि हृदयविकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, अधिक प्रमाणात मीठ कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. अशा परिस्थितीत आपण किती मीठ खात आहात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. मिठाचे नियंत्रित प्रमाण तुमच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे ठरते (More intake of salt can cause blood pressure and heart related issue).

जर तुम्हाला जेवणात अधिक मीठ खाणे आवडत असेल, तर या आवडीला वेळीच बंधने घातली पाहिजेत. आरोग्याला होणारे धोके लक्षात घेतल्यानंतरही जर आपली ही सवय सुटत नसेल, तर मिठाला पर्याय म्हणून आपण इतर घटक वापरू शकता. अन्नामध्ये अधिक प्रमाणात मिठाऐवजी लिंबू पावडर, आमचूर पावडर, ओवा, मिरपूड किंवा ओरेगॅनोची पाने वापरू शकता. या गोष्टी वापरल्याने मिठाची कमतरताही जाणवणार नाही आणि अन्नाची चवही वाढेल. अन्नपदार्थ शिजवल्यानंतर तुम्ही त्यात चवीनुसार मीठ घालू शकता.

या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक

जास्त मीठ खाण्याने बीपीसारख्या समस्या वाढू शकतात, हे बर्‍याच लोकांना माहित असेल. म्हणूनच आपल्या अन्नात मीठ शक्यतो कमी प्रमाणातच घाला. काही लोकांना जेवल्यानंतर मीठ खाण्याची सवय असते. त्यांनी ही सवय वेळीच मोडणे गरजेचे आहे. जे लोक जास्त प्रमाणात मीठ खातात, त्यांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जेवणासोबत पापड, लोणचे, सॉस, चटणी आणि चिप्स खाण्याची सवय असते. या पदार्थांमध्ये देखील मिठाचे प्रमाण अधिक असते. अधिकचे मीठ रक्तदाबसाठी देखील धोकादायक आहे.(More intake of salt can cause blood pressure and heart related issue)

सोडिअम शरीरासाठी घातक

मीठामध्ये सोडिअम असते, जे आपल्या शरीराला आवश्यक असते. पण त्याचे अधिक सेवन हृदयासाठी घातक ठरु शकते. मिठातले सोडिअम शरीरातील पाणी शोषते. त्यामुळे आहारात मीठ जास्त असेल तर डी-हायड्रेशन त्रास होऊ शकतो. म्हणून उच्च रक्तदाबाचा विकार असलेल्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. सैंधव किंवा शेंदेलोण हा मिठाला पर्याय होऊ शकत नाही. कारण त्यात जवळजवळ नेहमीच्या मिठाइतकेच सोडिअम क्लोराईड असते. सोडिअममुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढल्याने हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते.(More intake of salt can cause blood pressure and heart related issue)

अंगमेहनत करणाऱ्याला अधिक मिठाची गरज

अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मनुष्याला मिठाची अधिक गरज लागू शकते. कारण त्यांच्या घामावाटे जितक्या प्रमाणात मीठ बाहेर टाकले जाते, तितक्या प्रमाणात त्याच्या शरीराला मिठाची आवश्यकता असते. जर त्याने पुरेसा प्रमाणात मीठ घेतले नाही तर क्षारांचा अभावी त्याच्या शरीरातून कळा येतात, स्नायूंमध्ये वेदना होतात आणि पुष्कळ थकवा जाणवतो.

मात्र, बाकी सर्वसामान्य लोकांनी मीठ शक्यतो कमीच खावे. आहारात मिठाचे सेवन वर्ज्य केले तर निद्रानाश दूर होतो. झोप ही चांगली येते. अशा प्रकारे आपल्या रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले, तर आरोग्य सुधारते.

(More intake of salt can cause blood pressure and heart related issue)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.