जगातील सर्वात महागडे पाण्याचे 9 ब्रँड, एक लिटर पाण्यासाठी 44 लाख रुपये मोजावे लागतात, कारण..
जगात पाण्याचे असेही काही ब्रँड्स आहेत ज्यांच्या पाण्याची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल.
पॅरिस : आपण नेहमीच ऐकतो की पाणी हे जीवन आहे. पाण्याचा आपल्या आरोग्यदायी राहण्यातही मोठा वाटा आहे. म्हणूनच डॉक्टरही नेहमी जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगतात. त्यामुळेच जगभरात पाणी कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, जगात पाण्याचे असेही काही ब्रँड्स आहेत ज्यांच्या पाण्याची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल आणि ही पाण्याचीच किंमत आहे का असा वारंवार स्वतःलाच प्रश्न विचाराल (Most expensive Water Bottle in th world with special Bottles).
जगातील सर्वात महागड्या बाटलीबंद पाण्याची किंमत 60,000 डॉलर म्हणजेच 44 लाख रुपये प्रति 750 मिली इतकी आहे. या महागड्या पाण्याच्या ब्रँडचं नाव Acqua di Cristallo Tributo a Modigliani असं आहे. हे पाणी फिजी आणि फ्रान्समधील एका नैसर्गिक झऱ्याचं आहे. विशेष म्हणजे हे पाणी 24 कॅरेट सोन्याच्या बॉटलमध्ये पॅक केलं जातं.
Kona Nigari Water (750 मिली) : 29 हजार 306 रुपये
कोना नागरी पाणी हवाई (Hawai) येथील आहे आणि ते प्लास्टिक बॉटलमध्येच विकलं जातं. या पाण्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. या पाण्यामुळे केवळ शरीराचा उर्जा स्तर वाढत नाही, तर त्वचा देखील ताजीतवाणी होते. हे पाणी हवाई बेटावरुन येतं. या पाण्याचं सामान्य पाण्याच्या तुलनेत लवकर बाष्पीभवन होतं.
फिलिको (Fillico) ज्वेल वॉटर (750 मिली) : 15,965 रुपये
बाटलीबंद हे पाणी जपानमधील आहे. या पाण्याची बॉटल स्वारोवस्की क्रिस्टलने सजवलेली असते. या प्रकारची सजावट गिफ्ट म्हणून आयडियल मानली जाते. बाजारात या बॉटलची खूप कमी संख्या आहे. पाण्यापेक्षा या बॉटलचीच किंमत अधिक आहे. या बाटलीला गोल्डन क्राऊनने झाकलं जातं. या बाटलीतील पाणी ओसाकाजवळील रोक्को माऊंटेन येथून आणलं जातं. हे पाणी ग्रेनाईटचा उपयोग करुन शुद्ध केलं जातं. या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असतं.
Bling H2O (750 मिली) : 2,916 रुपये
Bling H20 पाणी संयुक्त राष्ट्र अमेरिकामधील आहे. हे पाणी 9 पातळींवर शुद्ध केलं जातं. हे पाणी वारंवार शुद्ध केलं जातं आणि मग पॅक केलं जातं. या पाण्याची बाटली ब्लिंग ब्लिंगने सजवलं जातं. यानंतर ही बॉटल शॅम्पेनच्या बाटलीसारखी दिसते.
10 Thousand BC (750 मिली) : 1,020 रुपये
हे कॅनडातील झऱ्याचं पाणी आहे. याची किंमत 14 डॉलर म्हणजेच 1,020 रुपये प्रति 750 मिलीलीटर आहे.
अॅक्वा डेको (Aqua Deco) (750 मिली) : 874 रुपये
अॅक्वा डेको ब्रँडचं पाणी देखील कॅनडामधून येतं. या पाण्याची बॉटल अत्तरच्या बॉटलचीच आठवण करुन देते.
लॉक्वेन आर्ट्स मिनरल वॉटर (Lauquen Artes Mineral Water) (750 मिली) : 437 रुपये
आर्टेशियन स्प्रिंग वॉटर ज्याला लॉक्वेन आर्ट्स मिनरल वॉटर या नावाने ओळखलं जातं. हे पाणी माऊंटेन एक्वीफरमधून येतं. हे ठिकाण सॅन कार्लोस बारिलपोचेजवळ आहे. हा भाग अर्जेंटीनाचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. या पाण्यात मिनरल्सचं प्रमाण अधिक आहे.
फाइन (Fine) (750 मिली) : 364 रुपये
फिन हे एक जपानी वॉलकनिक पाणी आहे. हे पाणी प्राचीन वॉलकेनिक रोकचा (volcanic rock) उपयोग करुन शुद्ध केलं जातं. हा वॉलकेनिक रॉक सर्वात सुंदर ठिकाण असलेल्या माऊंट फ़ुजी येथून येतो.
तस्मानियन रेन (Tasmanian Rain) (750 मिली) : 364 रुपये
तस्मानियन रेन हा पाण्याचा ऑस्ट्रेलियातील ब्रँड आहे. हे पाणी तस्मानिया बेटावरुन येतं. हे पाणी खूप शुद्ध आहे, असं मानलं जातं. हे पाणी पाऊस पडला की जमा केलं जातं. त्याला जमिनीचा स्पर्श होऊ दिला जात नाही. हे पाणी खूपच सुंदर बॉटलमध्ये पॅक केलं जातं. हे पाणी पिताना त्यातील बुडबुडे वेगळाच अनुभव देतात.
हेही वाचा :
Health | जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…
VIDEO | सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले, बजेट सादर करताना गंभीर बाब
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसान
व्हिडीओ पाहा :
Most expensive Water Bottle in th world with special Bottles