मांसाहार प्रेमी पाहुण्यांसाठी स्वादिष्ट पर्याय… मटण दम बिर्याणी

मांसाहाराची आवड असलेल्या पाहुण्यांसाठी पार्टीचं आयोजन करत असाल, तर मटण दम बिर्याणी हा उत्तम पर्याय ठरु शकतो

मांसाहार प्रेमी पाहुण्यांसाठी स्वादिष्ट पर्याय... मटण दम बिर्याणी
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:22 PM

साहित्य : अर्धा किलो मटण, अर्धा किलो बासमती तांदूळ, चार कांदे, एक टीस्पून जिरे पावडर, दोन टीस्पून धणे पावडर, दोन टीस्पून लाल तिखट, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, मसाला वेलची, 6-8 लवंग, 10-12 वेलची, चार टेबलस्पून तेल, आलं लसूण पेस्ट, दोन टेबलस्पून दही, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, पाणी (Mutton Dum Biryani recipe)

कृती – जिरेपूड, धणे पूड, लाल तिखट, खडे मसाले, मीठ, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून मटण मॅरिनेट करुन घ्या. त्यामध्ये दही घालून मिश्रण नीट मटणाला लावून घ्या. कमीत कमी तीन ते चार तास मॅरिनेशन फ्रिजमध्ये ठेवा.

कांदे बारीक चिरुन घ्या. पॅनमध्ये चिरलेले कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात तळून घ्या. कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने चिरुन घ्या. मॅरिनेट केलेल्या मटणात तळलेले कांदे आणि चिरलेली कोथिंबीर-पुदिना घाला.

बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवा. भात करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, खडे मसाले, चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, लिंबाची फोड आणि थोडे तेल घाला.

थंडीच्या दिवसांत लाभदायक ‘फॅटी’ फूड, वजन नियंत्रणासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील!

उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि भात 80 टक्के शिजवा. जाड बुडाच्या पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये मटण घाला. भात गाळून गरम असताना लगेचच मटणावर पसरवून टाका. भातावर आणि सर्व बाजूने तूप घालून घ्या. केशर भिजवून दूध घाला. थोडेसे तळलेले कांदे पसरवा

कणिक लावून भांड्याचे झाकण घट्ट बंद करा. वाफ जराही बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आधी मोठ्या आचेवर पाच ते दहा मिनिटे, त्यानंतर आच कमी करुन मंद आचेवर 40 ते 45 मिनिटं बिर्याणी दम होण्यासाठी ठेवून द्या. दम बिर्याणी तयार

(Mutton Dum Biryani recipe)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.