VIDEO | पैठणीच्या पदरावर झोका घेणारे राधाकृष्ण, येवल्याच्या कुशल भावंडांची कारागिरी

येवल्यातील अनिल काकडे आणि उमेश काकडे या दोघा भावंडांनी पैठणी साडीच्या पदरावर राधाकृष्ण झोका खेळत असल्याचे चित्र साकारले (Nashik Yeola Paithani Radha Krishna)

VIDEO | पैठणीच्या पदरावर झोका घेणारे राधाकृष्ण, येवल्याच्या कुशल भावंडांची कारागिरी
पैठणीच्या पदरावर झोका घेणारे राधाकृष्ण
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:53 PM

येवला : येवल्यातील कारागिराने राधा-कृष्ण झोका खेळत असल्याची पैठणी विणली आहे. पैठणी विणण्यास त्याला 30 दिवसांचा कालावधी लागला. अनिल काकडे आणि उमेश काकडे या दोघा भावंडांनी पैठणीच्या पदरावर राधाकृष्ण झोका खेळत असल्याचे चित्र विणकाम करुन साकारले. महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्राचे’ हे रुप महिलांचे सौंदर्य आणखीच खुलवणार आहे. (Nashik Yeola Paithani has Radha Krishna Picture)

येवला शहर हे पैठणी साडीसाठी जगात प्रसिद्ध आहे. येवल्यातील कारागिरांनी आतापर्यंत नैसर्गिक सौंदर्य, देवतांचे फोटो, तर कधी राजकीय नेत्यांचे फोटो आपल्या हाताने विणकाम करुन काढलेले आहेत. अशाच प्रकारे येवल्यातील अनिल काकडे आणि उमेश काकडे या दोघा भावंडांनी पैठणी साडीच्या पदरावर राधाकृष्ण झोका खेळत असल्याचे चित्र विणकाम करुन साकारले आहे.

ही साडी विणण्यास काकडे बंधूंना एका महिन्याचा कालावधी लागला. नेहमीच अशा विविध प्रकारच्या पैठणी येवल्यातील पैठणी कारागीर आपल्या कलेच्या माध्यमातून हाताच्या साह्याने विणकाम करून साकारत असतात.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नुकतीच आपल्या पत्नीसाठी सुंदर पैठणी खरेदी केली. गृहमंत्र्यांनी आपल्या घरच्या ‘होम मिनिस्टर’ आरती देशमुख यांना पैठणी भेट दिली. केवळ नव्या वर्षाची भेट म्हणून नव्हे तर ही पैठणी खरेदी करण्यामागे एक सामाजिक दृष्टीही होती.

देशमुख यांनी पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी कैद्यांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तूंचे विक्री केंद्र आहे. याच केंद्रातून गृहमंत्र्यांनी तुरुंगातील कैद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने त्याची साडे नऊ हजार रुपये ही किंमतही दिली आहे.

दोन्ही बाजूने नेसता येणारी पैठणी

नेहमीच एकाच बाजूने नेसता येणारी पैठणी आता दोन्ही बाजूने परिधान करता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रुपातील पैठणी दोन्ही बाजूने दोन रंगाची असणार आहे. सर्वसाधारण पैठणी वा साडी ही एकाच बाजूने परिधान करता येते आणि तिचा रंगही एकच असतो. मात्र दोन्ही बाजूने दोन रंगाची आणि दोन्ही बाजूने महिलांना परिधान करता येईल अशी आगळीवेगळी पैठणी येथील 75 वर्षीय राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त विणकर शांतीलाल भांडगे यांनी बनविली आहे. विशेष म्हणजे पैठणीच्या आजवरच्या वाटचालीतील ही एकमेव पैठणी साकारली आहे. ही पैठणी टू-इन-वन स्वरूपाची आहे.

संबंधित बातम्या :

घरच्या ‘होम मिनिस्टरसाठी’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क येरवडा कारागृहातून

नववर्षात येवल्याच्या पैठणीत मोठा बदल, दोन्ही बाजूने नेसता येणारी पैठणी दोन रंगात

(Nashik Yeola Paithani has Radha Krishna Picture)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.