Hair Care | कृत्रिम हेअर कलरमुळे होईल केसांचे नुकसान, ट्राय करा ‘हा’ नैसर्गिक हेअर मास्क!
आजकाल केसांना रंग करणे फॅशनचा ट्रेंड बनत चालला आहे. विशेषतः मुली आणि महिलांमध्ये याची खूप क्रेझ आहे. केस रंगवण्यासाठी मुली भरपूर पैसे खर्च करतात.
मुंबई : आजकाल केसांना रंग करणे फॅशनचा ट्रेंड बनत चालला आहे. विशेषतः मुली आणि महिलांमध्ये याची खूप क्रेझ आहे. केस रंगवण्यासाठी मुली भरपूर पैसे खर्च करतात. कलर केल्यानंतर काही दिवस केस खूप सुंदर दिसतात. पण, हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. या कृत्रिम रंगामुळे केसांचे नुकसान होते आणि याची माहिती होईपर्यंत आपले केस खूप कमकुवत आणि निर्जीव झाले असतात (Natural Hair Mask for hair growth and colour).
कृत्रिम हेअर कलरचे दुष्परिणाम :
- ट्रेंड म्हणून वारंवार केसांचा रंग बदलल्यास आपल्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्यांची वाढ थांबू शकते. तसेच, केस गळणे आणि केस पातळ होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
- हेअर कलरमध्ये वापरली जाणारी सर्व रसायने आपल्या डोळ्यांवर परिणाम करतात. यामुळे, आपली दृष्टी खूप कमकुवत होऊ शकते. तसेच, या रंगांच्या अति वापरामुळे काही लोकांना विस्मरणाचा धोका देखील निर्माण झाला आहे.
- ज्यांना दमा किंवा अस्थमाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी केसांचा कृत्रिम रंग बर्याच समस्या निर्माण करू शकतो. केसांच्या रंगात अशी सर्व रसायने आहेत ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
- बरेच लोक केसांना रंगवण्यासाठी हेअर डायचा वापर करतात. त्यासर्व लोकांमध्ये कर्करोग होण्याचा धोका वाढतो आहे. डाय किंवा कृत्रिम रंग वापरताना, आपल्याला थोडाशी अॅलर्जी वाटत असेल, तर त्याचा वापर लगेच थांबवा (Natural Hair Mask for hair growth and colour).
खराब झालेल्या केसांसाठी नैसर्गिक हेअर मास्क ठरेल उपयोगी!
जर, आपले केस कृत्रिम रंगाने खराब आणि कमकुवत झाले असतील, तर आपण घरात असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींसह केसांचा एक चांगला मास्क तयार करू शकता. हा हेअर मास्क आपल्या केसांच्या वाढीस मदत करेल आणि केसांची गळती रोखेल.
हेअर मास्क कसा बनवायचा?
नैसर्गिक हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात तीन चमचे कोरफड, दोन चमचे एरंडेल तेल, चार चमचे ऑलिव्ह ऑईल, एक केळी, चार चमचे दही आणि अंड्याचा पिवळा भाग घेऊन चांगल्याप्रकारे मिसळा. यात मिश्रणात केळी दह्यासोबत वाटून हे मिश्रण आधीच्या मिश्रणात मिसळावे. यानंतर हा हेअर मास्क केसांवर लावावा आणि थोडा वेळासाठी केस तसेच ठेवावेत. काही वेळाने केस धुवावेत. जर, केस जास्त खराब झाले असतील तर, आठवड्यातून दोनदा या हेअर मास्कचा वापर करावा. याने लवकरच चांगला फायदा दिसून येईल.
(Natural Hair Mask for hair growth and colour)
हेही वाचा :
Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!https://t.co/sc6btZu150#haircare #Tips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020