हे आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्याचे नैसर्गिक उपाय, तुमच्या जीवनशैलीत करा हे बदल

हे आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्याचे नैसर्गिक उपाय, तुमच्या जीवनशैलीत करा हे बदल (natural remedies to boost immunity power)

हे आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्याचे नैसर्गिक उपाय, तुमच्या जीवनशैलीत करा हे बदल
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे आहेत उत्तम मार्ग
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 7:07 PM

मुंबई : कोणत्याही प्रकारच्या आजाराचा तुम्हाला सामना करायचा असेल तर तुमची इम्युनिटी पावर मजबूत असणे गरजेचे आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी डाएट आणि लाईफस्टाईल दोन्ही परफेक्ट असणे आवश्यक आहे. नैसर्गिक उपायांनी शरीरातील प्रतिकारशक्ती कशी मजबूत करायची याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (natural remedies to boost immunity power)

झोप पूर्ण करा

झोप आणि प्रतिकारशक्ती यांचे जवळचे नाते आहे. झोप पूर्ण न झाल्यास अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. एका अभ्यासानुसार, जे लोक 6 तासापेक्षा कमी झोपतात त्यांना सर्दी, पडसे होण्याची शक्यता अधिक असते. तंदुरुस्त राहण्यासाठी कमीत कमी 8 तासांची झोप अवश्य घ्या. पूर्ण झोप घेतल्यास शरीरात नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढते. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा आराम केल्याने तुमची प्रतिकारशक्ती आजारावर मात करते. जर तुम्हाला लवकर झोप येत नसेल तर झोपण्याच्या एक तास आधी फोन, टिव्ही, कॉम्प्युटर बंद करा.

वनस्पतीजन्य पदार्थ अधिक खा

फळे, भाज्या, शेंगदाणे, मेवा आणि शेंगांमध्ये पोषक तत्वं आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे शरीरात फ्री रॅडिकल्सशी लढा देतात ज्यामुळे पेशी सुरक्षित राहतात. वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे तंतू आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि हानिकारक बॅक्टेरिया पचन तंत्राद्वारे शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी सामान्य सर्दी बरी करते.

साखर नियंत्रणात ठेवा

अभ्यासात निष्पन्न होते की, एडेड साखर आणि रिफाइंड कार्ब लठ्ठपणा वाढवतात. लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण असते. वजन वाढण्यासोबत हृदयविकार आजार आणि डायबिटिज वाढण्याचा धोका असतो. या दोन्ही गोष्टी प्रतिकारशक्ती कमजोर करतात. शुगर नियंत्रणात ठेवल्यास तुमचे वजनही नियंत्रणात राहते आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढते. दिवसभरात दोन चमच्यांपेक्षा अधिक साखरेचे सेवन करु नका.

हायड्रेटेड रहा

शरीराला पूर्ण स्वस्थ ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे जरूरी आहे. पाण्याच्या कमतरतेचा परिणाम पचनक्रिया, हृदय आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर होता. ज्यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. यासाठी आहारात लिक्विड डाएट वाढवा. बाजारात मिळणारे ज्यूस आणि अधिक साखरसुक्त चहा पिण्याचे टाळा. भरपूर पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर आतून स्वच्छ राहिल आणि आजाराचा धोका कमी होईल.

हल्की-फुल्की एक्सरसाईज करा

भरपूर व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर दबाव येतो, तर हल्की-फुल्की एक्सरसाईज प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. नियमितपणे असे केल्याने इंफ्लेमेशन कमी होते आणि रोगप्रतिकारक पेशीत वाढ होते. ब्रिस्क वॉकिंग, सायकल चालवणे, जॉगिंग, स्विमिंग आणि चालण्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते.

ताण घेऊ नका

ताण आणि दबाव प्रतिकारशक्तीवर परिणाम करते. दीर्घकाळ तणावात राहिल्याने रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. यामुळे इंफ्लेमेशन वाढते. तणाव दूर करण्यासाठी मेडिटेशन, योग आणि एक्सरसाईज करा. पुस्तके वाचा आणि स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवा.

हेल्दी फॅटचे सेवन करा

ऑलिव्ह ऑईल आणि सॅमनमध्ये आढळणारे हेल्दी फॅट शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे हृदय आणि टाईप 2 मधुमेह सारख्या आजाराचा धोका कमी होतो. त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूंविरूद्ध लढायला मदत करतात. चिया बिया आणि सॅल्मन फिशमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड इंफ्लेमेशन कमी होते.

योग्य सप्लीमेंट्सची निवड करा

जर तुम्ही प्रतिकारशक्तीसाठी पूरक आहारावर अवलंबून असाल तर सतर्क रहा. यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार सप्लीमेंट कोरोना विषाणूपासून बचाव करु शकेल किंवा उपचार करू शकते याचा कोणताही पुरावा नाही. तथापि काही अभ्यासकांच्या मते विटामिन सी, डी आणि जिंक सप्लीमेंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. (natural remedies to boost immunity power)

इतर बातम्या

जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित, तुम्हीही करु शकता या ऑर्गनिक वस्तूंचा वापर

Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.