वॅक्सिंगनंतर आलाय लालसरपणा ? आराम मिळवण्यासाठी करून पहा हे सोपे उपाय

Face Redness : वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लालपणा येतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपण काही साध्या सोप्या उपायांचा आणि ट्रिक्सचा वापर करू शकतो. घरच्या घरीदेखील हे उपाय करता येतात. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.

वॅक्सिंगनंतर आलाय लालसरपणा ? आराम मिळवण्यासाठी करून पहा हे सोपे उपाय
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 5:26 PM

Face Redness After Waxing : शरीरावरील नकोसे केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) केले जाते. ज्या महिलांच्या हाता-पायांवर तसेच चेहऱ्यावर जास्त केस असतात, त्या आपल्या चेहऱ्यासाठी ब्लीच, थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करून घेतात. आपल्या चेहऱ्याची त्वचा (face skin) नाजूक असते. अशावेळी चेहऱ्यावर लालसरपणा (redness) दिसू लागतो

वॅक्सिंग करताना जिथे जास्त केस असतात त्या भागावर वॅक्स लावून त्यावर स्ट्रिप्स लावून जोरात खेचले जाते व नकोसे केस काढले जातात. चेहऱ्यासाठी असेच केले जाते. मात्र त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, रॅशेस, खाज येणे, जळजळणे आणि वेदना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या महिलांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांना ही समस्या आणखी त्रास देऊ शकते. चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी, आपण नवीन उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. मात्र त्यामुळे त्वचा आणखी खराब होऊ शकते.

फेस वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. ते कोणत हे पाहू..

बर्फाने शेका

चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी चेहरा बर्फाने शेकू शकता. त्यासाठी एका सुती कापडात बर्फ गुंडाळा व त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनिटे बर्फाने शेकल्यावर चेहऱ्यावरील लालसरपणा कमी झाल्याचे जाणवेल. हा सर्वात उत्तम उपाय आहे.

कोरफडीचे जेल वापरू शकता

वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तुम्हाला लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्यामुळे त्वचेलाही थंडावा मिळतो. तसेच त्यातील अँटीसेप्टिक घटकांमुळे सूज आणि पुरळ यापासून आराम मिळतो.

हळद व मध गुणकारी

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लालसर झाली असेल तर मध व हळदीचा लेप लावा. या दोहोंमध्येही अँटीबॅक्टेरिअल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. सूज व वेदना कमी करण्यासाठी हा लेप थोडा वेळा लावून ठेवा. साधारण अर्ध्या तासाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. काही लोक लिंबाचाही वापर करतात. मात्र लिंबामुळे लालसरपणा व इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे लिंबाचा वापर बिलकूल करू नका.

काकडी ठरेल उपयुक्त

काकडीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर काकडीचे पातळ काप करावेत व ते चेहऱ्यावर ठेवा. हवे असेल तर काकडी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेऊ शकता. चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी काकडीचा वापर फायदेशीर मानला जातो. काकडी चेहऱ्यावर ठेवल्याने जळजळ व सूज दूर होण्यासही मदत होईल.

गुलाब जलही उपयोगी ठरेल

गुलाब जल हे चेहऱ्यासाठी टोनरप्रमाणे कार्य करते. वॅक्सिंग नंततर चेहऱ्याचा लालसरपणा कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते. गुलाब जल फ्रीजमध्ये ठेून थंड करावे व कापसाच्या मदतीने ते चेहऱ्यावर लावावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.