तुळशीला पाणी देताना या चुका करु नका, अन्यथा बिघडेल घराची शांतता

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते.

तुळशीला पाणी देताना या चुका करु नका, अन्यथा बिघडेल घराची शांतता
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 8:13 PM

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात सुख, समृद्धी येते. त्याचबरोबरआपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान नारायणाची पूजा आणि नैवैद्य अपूर्ण मानला जातो. तसेच दररोज सकाळी तुळशीमध्ये पाणी देऊन संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. परंतु तुळशीची पूजा करताना या चुका करणे टाळावे अन्यथा पूजेचे योग्य फळ मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया तुळशीत पाणी देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

तुळशीला पाणी देण्याची योग्य वेळ

तुळशीला नेहमी सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच सकाळी पाणी द्यावे. हा काळ उत्तम आणि फलदायी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्यास शुभ फळ मिळते. घरात पैश्यांसंबंधित कोणतीही समस्या असल्यास त्या ही दूर होतात.

या दिवशी तुळशीत पाणी अर्पण करू नका

जर तुमच्या घरात तुळस असेल तर तुम्ही रोज पाणी घालावे. परंतु रविवार, एकादशीला तुळशीमध्ये पाणी अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशी माता पाण्याविना उपवास करते आणि जल अर्पण केल्याने तिचे व्रत मोडले जाऊ शकते. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा वाचा

दिशा लक्षात ठेवा

जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावत असाल तर दिशेची विशेष काळजी घ्या. चुकूनही दक्षिण दिशेला तुळशीचे रोप ठेऊ नये. असे म्हटले जाते की तुळस दक्षिण दिशेला ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

तुळशीला पाणी देण्यासाठी योग्य नियम

तुळशीत जास्त प्रमाणात पाणी देऊ नये. असे केल्याने तुळशीच्या रोपांची मुळे खराब होऊ लागतात आणि तुळशीचे रोप लवकर कोरडे पडू लागते. असे म्हणतात की सुकलेले तुळशीचे रोप चांगले नाही.

महिलांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

तुळशी मातेची पूजा करताना महिलांनी केस सुटे ठेवू नयेत. महिलांनी नेहमी केस बांधून तुळशीची पूजा करावी. असे केल्याने शुभ फलप्राप्ती होते.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.