त्वचेवर कधीही वापरू नका ही क्रीम्स, फायद्यापेक्षा होते जास्त नुकसान
बर्याच वेळेस आपण विचार न करता त्वचेवर काही अशा गोष्टी लावतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ लागते.

नवी दिल्ली – आपली त्वचा खूप नाजूक असते आणि अनेक प्रकारे त्वचेची काळजी (skin care) घेण्याचा प्रयत्न करतो. कधी चेहरा बरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो अथवा ब्युटी ट्रीटमेंट (beauty treatment) केले जाते, तर कधी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा (creams for skin) वापर केला जातो. पण अनेक क्रिम्समुळे आपल्या त्वचेवर नकळतपणे जळजळ होऊ लागते आणि रॅशेसही येऊ शकतात. अशा वेळी त्वचा खूप लाल होते किंवा काही वेळा रिॲक्शनमुळे जखमाही होतात.
जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा अनेक गोष्टी त्वचेवर लावतो ज्या लावणे योग्य नसते. त्वचारोगतज्ञ कधी-कधी आपल्याला अशा क्रीम्स लिहून देतात ज्या विशिष्ट समस्येसाठी असतात, परंतु समस्या संपल्यानंतरही लोक त्याचा वापर करत असतात. हे घातक ठरू शकते. त्वचेसाठी कोणती क्रीनम्स वापरू नयेत हे जाणून घेऊया.
टॉपिकल स्टिरॉइड्स




आपण विचार न करता मोमेटासोन, फ्लुटिकासोन, बीटामेथासोन अशी अनेक क्रीम लावतो. त्यामुळे आपली त्वचा इतकी खराब होऊ शकते की त्वचेवर काळे डाग पडू शकतात. बहुतेक लोक या क्रीम्सचा वापर गडद स्पॉट्स कमी करण्यासाठी करतात, परंतु त्याचा उसलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टॉपिकल स्टिरॉइडपासून दूर रहावे आणि डर्मिटॉलॉजिस्टनी ते लिहून दिले तरच वापर करावा.
स्टिरॉइड क्रीम
Betnovate-N सारखी अनेक स्टिरॉइड क्रीम्स आहेत ज्याचा वापर लोकं गोरं होण्यासाठी किंवा मुरुम कमी करण्यासाठी करतात. त्याचा लगेच प्रभाव तर दिसतो पण त्यामुळे मुरमं अजून खराब होऊ शकतात. या क्रीम्सचा बराच काळ वापर केल्यास त्वचा पातळ होऊ शकते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या अधिक दिसतात. यासोबतच चेहऱ्यावरील केसही अधिक वाढू शकतात.
ही क्रीम्स कधी वापरावीत ?
ही क्रीम्स नेहमी डॉक्टरांनी सांगितल्यावरच वापरावीत. एक्जिमा, त्वचारोग, सोरायसिस यांसारख्या अनेक समस्यांसाठी ही क्रीम्स लिहून दिलेली असतात, पण त्याचा वापर फार कमी काळासाठी करायचा असतो.
तुमच्या त्वचेला काय सूट होईल आणि काय नाही हे जाणून घेण्यासाठी कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी तुम्ही नेहमी तुमच्या त्वचेची पॅच टेस्ट करावी. पॅच टेस्ट करून, जर तुमच्या त्वचेवर काही प्रतिक्रिया दिसत असेल तर ते आधीच कळते. तसेच आपल्या त्वचेवर कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी, आपण एकदा डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे. तज्ञांच्या सूचना अधिक योग्य असतात.