New Year Eve : तुम्ही दारू प्यायला की नाही? हे Breath Analyser ने कसे कळते?
नवीन वर्षाच्या उत्सवात दारूचे पिण्याचे प्रमाम वाढते. पण दारू पिऊन वाहन चालवणे धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. पोलिस ब्रेथ अॅनालायझर मशीन वापरून दारूच्या नशेत असलेल्यांना शोधतात. ही मशीन फुफ्फुसातून बाहेर पडणाऱ्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजते.
फक्त काही तासात जुनं वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होणार आहे. देशच नव्हे तर अवघं जग जल्लोषाच्या मूडमध्ये आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नाचगाणं आणि खाण्यापिण्यावर प्रत्येकाचा भर असणार आहे. त्यासाठी सर्वच हॉटेल, पब, रेस्टॉरंट बुक झाले आहेत. अनेकजण पेगवर पेग रिचवण्यासाठी सज्ज आहेत. तर या तळीरामांचं विमान जमिनीवर उतरवण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत. वाहतूक पोलीसही कोणताही अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेणार आहेत. तसेच दारू चालवून वाहन चालवणाऱ्यांवरही आपली वक्रदृष्टी वळवणार आहेत.
2023च्या थर्टीफर्स्टला एकट्या दिल्लीत 24 लाख दारूच्या बॉटल विकल्या गेल्या. तर 2022च्या 31 डिसेंबर रोजी 20 लाख दारूच्या बॉटल विकल्या गेल्या. यावरून प्रत्येक वर्षी देशात नवीन वर्षाच्या निमित्ताने लाखो रुपयांची दारू विकली जात असल्याचं दिसून येत आहे. तुम्ही जर दारू प्यायला असेल तर त्यासाठी काही डूज आणि डोन्ट्सही आहेत. म्हणजे दारू प्यायल्यानंतर सार्वजनिकपणे काय करू शकतो, काय नाही करू शकत हे सांगितलं गेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं.
दारू प्यायल्यानंतर गाडी चालवण्याची प्रकरणं समोर येत आहेत. खरं तर दारू पिऊन गाडी चालवणं हे बेकायदेशीर आहे. दारू पिऊन गाडी चालवल्याने स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातला जातो. त्यामुळे वाहतूक पोलीस नाक्या नाक्यावर ब्रेथ अॅनालायझर नावाची मशीन घेऊन प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करत असतात. तुम्ही दारू प्यायलात की नाही हे ही मशीन शोधून काढते. पण खरोखरच तोंडाच्या वासाशी या मशीनचा काही संबंध आहे का?
तोंडाने का येतो वास?
जेव्हा कोणी दारू पितो तेव्हा रक्त कोशिकांच्या माध्यमातून ही दारू रक्तात मिसळते. त्याचा थेट परिणाम दारु पिणाऱ्याच्या फुफ्फुसावर होतो. तिथूनच सर्व समस्या सुरू होते. फुफ्फुसावर दारूचा परिणाम होतो. आणि त्यामुळेच वास येतो. अशावेळी जेव्हा दारू पिणारा श्वास सोडतो त्याच्या नाक आणि तोंडावाटे वास येतो.
तीन रंग…
हेच काम ब्रेथ अॅनालायझर मशीन करते. ही मशीन तोंडातून निघालेल्या हवेच्या माध्यमातून रक्तातील अल्कहोलच्या लेव्हलची तपासणी करते. व्यक्तीने अल्कोहल घेतलं की नाही याची तपासणी करणाऱ्या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तीन लाइट्स असतात. हिरवा, पिवळा आणि लाल रंगाच्या लाइट्स. हिरव्या रंगाचा अर्थ तुम्ही गाडी चालवू शकता. पिवळ्या आणि लाल रंगाचा अर्थ तुम्ही दारूच्या नशेत आहात. काही ब्रेथ अॅनालयझरमध्ये लाइट्स नसतात.