Nita Ambani Weight loss | गर्भावस्थेदरम्यान 30 किलोने वाढलेलं नीता अंबानींचं वजन, ‘या’ डाएट प्लॅननी झाल्या स्लिमट्रीम!
गर्भधारणेनंतर बर्याचदा स्त्रियांचे वजन प्रचंड वाढते. असेच काहीसे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या बाबतीत घडले होते.
मुंबई : गर्भधारणेनंतर बर्याचदा स्त्रियांचे वजन प्रचंड वाढते. असेच काहीसे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या बाबतीत घडले होते. प्रसूतीच्या वेळी त्याचे वजन सुमारे 20 ते 30 किलोने वाढले होते. पण स्वत:ला पुन्हा एकदा फिट करण्यासाठी नीता अंबानी यांनी जोरदार कंबर कसली होती. तसेच, त्यांनी आपल्या आहार योजनेतही काही खास बदल केले, ज्याद्वारे त्यांचे वजन कमी झाले आणि त्या पुन्हा एकदा मूळ वजनात परत आल्या (Nita Ambani Weight loss journey after pregnancy).
ज्यूस नाही केला ‘मिस’!
रस पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात मुबलक प्रमाणात खनिजे असतात. यामुळेच नीता अंबानी आपल्या आहार यादीमध्ये रस अर्थात ज्यूस सामील करण्यास विसरल्या नाहीत. त्या रोज बीटाचा रस सेवन करत होत्या. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स शरीर निरोगी बनवण्यात मदत करतात. यामुळे त्वचेचा घट्टपणा वाढतो. तसेच हा रस वजन कमी करण्यास देखील मदत करतो.
न्याहारीमध्ये होते ‘हे’ पदार्थ
नीता अंबानी ड्रायफ्रुट्स खाऊन त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. गरोदरपणात त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली होती. यामुळे, प्रथिनांची कमतरता पूर्ण झाली. यामुळे शरीरात ऊर्जा देखील मिळते. तसेच भूकेवरही नियंत्रण ठेवले जाते. याशिवाय त्या न्याहारीमध्ये अंड्याच्या पांढऱ्या भागाचे ऑमलेट खात असत.
दुपारचे जेवण
दुपारच्या जेवणाच्या वेळी हिरव्या भाज्यांवर लक्ष केंद्रित केले जात होते. दुपारी नीता अंबानी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या आणि सूप घेत असत. यावेळी त्यांनी बहुतेक भाज्या स्टीम करून खाल्ल्या आहेत. त्या अजूनही ही दिनचर्या पाळतात. याशिवाय त्या हंगामी फळंही खात होत्या. जंक फूडपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले (Nita Ambani Weight loss journey after pregnancy).
रात्रीचे जेवण
रात्रीच्या जेवणामध्ये त्या हलका आहार घ्यायच्या. रात्रीच्या जेवणामध्ये त्या कमीतकमी अन्न पदार्थ खातात. त्यात त्यांना हिरव्या भाज्या, सूप आणि मोड आलेले धान्य खायला आवडते. रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न नीता अंबानी करतात. जेणेकरून अन्न पचायला अधिक वेळ मिळेल.
दररोज 40 मिनिटांचा व्यायाम आवश्यक
नीता अंबानी देखील दररोज 40 मिनिटांसाठी व्यायाम करतात. त्या स्वतः एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तिका असल्याने, त्यांचा फिटनेस कायम ठेवण्यासाठीही नीता या रूटीनचा अवलंब करत होत्या.
(टीप : आहारात किंवा दिनचर्येत कोणतेही आवश्यक बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Nita Ambani Weight loss journey after pregnancy)
हेही वाचा :
Weight Loss Tips | रात्रीच्या वेळी ‘या’ पदार्थांचे सेवन करा, वजन नियंत्रणासाठी ठरेल लाभदायी!#weightloss | #Dinner | #weightlossdiet | #weightlosstips https://t.co/KIuYeMHmyR
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021