Valentine Day : हे ‘कोट्स’ वाचा आणि ठरवा तुमचा ‘व्हेलेंटाईन’ कसा आहे ते
'व्हेलेंटाईन डे' सह त्या पूर्ण आठवड्याची वाट आतुरतेनं पाहतात. Propose Day, Kiss Day, Teddy Day, Hugging Day, Chocolate Day ते International Kissing Day असा आठवड्याच्या प्रवास आज Valantine day पर्यंत येऊन पोहोचला आहे.
मुंबई : फेब्रुवारी महिना सुरू वेध लागतात ते ‘व्हेलेंटाईन डे’चे. फेब्रुवारीचा दुसरा आठवड्यातील रविवार हा खरा ‘व्हेलेंटाईन डे’. पण, १४ फेब्रुवारी हाच दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून जगमान्यता पावला आहे. ‘व्हेलेंटाईन डे’ सह त्या पूर्ण आठवड्याची वाट आतुरतेनं पाहतात. Rose Day, Propose Day, Chocolate Day, Teddy Day, Hugging Day, ते Kiss Day असा आठवड्याच्या प्रवास आज Valantine day पर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या मनात असलेलं आपल्या प्रिय व्यक्तीजवळ व्यक्त करण्याचा हा दिवस. सुरवातीला हा दिवस जोडप्याचा असं म्हटलं जायचं. पण, कालानुरूप त्यात बदल होत गेला. आता कुटूंबातील सगळेच एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देऊन एकमेकांबद्दल प्रेम, आदर व्यक्त करतात. या निमित्ताने काही विनोदबुद्धीचे जोक्सही करतात.
‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस असलेल्या या दिवशी असेच काही मिम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच काही हे खास जोक्स. अर्थात सुरवात एका अनामिक कवीच्या कवितेने
प्रेम सखीवर करावे… बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे… बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर करावे… जमल्यास, दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे… निधड्या छातीवर करावे ..!
शिवबाच्या बाण्यावर… लताच्या गाण्यावर करावे ..!
सचिनच्या खेळावर आणि वारकऱ्यांच्या टाळावर हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे .. प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच .. देशावर … ही करावं
स्वतःवर … स्वतःच्या कुटुंबियांवर प्रेम करावे .!!!!!!
‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी राजकीय कोट्या करणारेही काही कमी नसतात, अशीच एक कोटी
मुद्दतों के इन्तज़ार के बाद बडी हिम्मत से मैने उसे बताया, मुझे ‘आप’ पसंद हैं वो बडी नासमझ निकली, और बोली, मुझे ‘भाजपा’
पती – पत्नीवर आलेले जोक्स
– प्रेयसी जेव्हा हद्द विसरून आपल्याशी वाईट वागू लागली असेल तर समजून जा की मानसिक रूपाने आपली बायको बनण्याच्या तयारीत आहे.
– गुलाब देणारा फक्त फेब्रुवारी मध्येच साथ देतो… पण, कोथिंबीर, फ्लॉवर आणून देणारा आयुष्यभर साथ देतो
– ती मला बोलली डेअरी मिल्क घेऊन ये मी डेअरी मधुन दुध आणलं यात माझं काय चुकलं?
– डिअर ! तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा शेतात गुलाब लावला असता तर आज रोज डे च्या दिवशी ढिगभर पैसा आला असता
– एक दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या….काय अर्थ आहे ?
अपमान पण थोडक्यात
– या एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का? आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या
– कुठल्याही मुलीला प्रपोज करायचं असल तर Valentine Day ला करु नका, 1 एप्रिलला करा भाग्य चमकलं तर व्यक्त व्हा, नाही तर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या, उगीच मार खायचं लक्षण नको
– काही मुली म्हणतात, मला खूप मुलांनी मागणी घातली आहे. तू एकटाच नाही… पण त्यांना एक अर्थशास्त्रीय सिद्धांत माहीत नाही की जेव्हा किंमत कमी होते तेव्हाच मागणी वाढते…
– शेजारणीशी सूड उगवायचे असेल तर तिचा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी तिच्या दाराबाहेर एक चॉकलेट, कार्ड, आणि फुल ठेवून द्या… मग ती हाताळत राहणार प्रकरण…
– लग्नाआधी Rose day, Chocolate day, Hug day, valentines day आणि लग्नानंतर टिफिन दे, चहा दे, झोपू दे, ए बया जगू दे….
– तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील, की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील? तुटलेल्या चपलेने मार खाशील, की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?
– तिचा फोन आला, खुप अकडुन म्हणाली, विसरुन जा मला. तो म्हणाला, आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?
– साठवून ठेवलेल्या पैशाचा गल्ला फोडला, पैसा संपला, हुश्श एकदाचा व्हेलेंटाईन आठवडा आता संपला
– विचार करतोय 20 रुपयांचा गुलाब देण्यापेक्षा मित्रासोबत एक एक वडापाव खाऊ त्या 20 रुपयाचा
व्हाट्सअप व्हायरल
– फेसबुक’ वरच्या डीपी वरची राजा आणिक राणी… अर्ध्यावरती चॅट संपला अधूरी एक कहाणी…!
– 14 फेब्रुवारी आलाच आहे तर online प्रेमात पडण्या अगोदर एकदा video call करुन बघा.. नाहीतर packing मध्ये अब्बा डब्बा पण निघू शकतो.
– कोणी ही धक्का बुक्की नका करू. सगळ्या मुलींना चान्स भेटणार आहे. मला प्रपोज करायला. मुलींची ओळख झाल्यावर लगेच प्रपोज करणे म्हणजे अति घाई Block list मध्ये नेई
– तिला गुलाबाचं फूल का आवडतं ? ते तर एका दिवसात मरून जातं ! मग तिला मी का आवडत नाही ? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो ! भारी रे ! एक नंबर ! Whatsapp वर टाक !