Kalavantin Durg । वन डे ट्रेकचा प्लॅन करताय, मग मुंबई जवळचा कलावंतीण दुर्ग तुमची वाट पहातोय!

| Updated on: Dec 18, 2020 | 1:13 PM

तुम्हाला साहसाची आवड असेल, आणि एक दिवसाच्या ट्रेकची योजना आखत असाल तर, मुंबई जवळच्या या ‘कलावंतीण दुर्गा’ला नक्की भेट दिलीच पाहिजे.

Kalavantin Durg । वन डे ट्रेकचा प्लॅन करताय, मग मुंबई जवळचा कलावंतीण दुर्ग तुमची वाट पहातोय!
Follow us on

मुंबई : निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वत रंगांमध्ये ताठ मानेने उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे, तसे मोठ्या धाडसाचे आहे. चढाई करण्यास सर्वात अवघड सुळका अशी या दुर्गाची ओळख आहे. प्रबळमाचीच्या शेजारी उभा असलेला ‘कलावंतीण दुर्ग’ म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते (One Day Trek Plan at Kalavantin Durg  near Mumbai).

मुंबईतून बाहेर पडल्यावर, पनवेल आणि कर्जत दरम्यान जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो. प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी, असे मनमोहक दृश्य दिसते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्रबळ माची या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते. तरीही तुम्हाला साहसाची आवड असेल, आणि एक दिवसाच्या ट्रेकची योजना आखत असाल तर, मुंबई जवळच्या या ‘कलावंतीण दुर्गा’ला नक्की भेट दिलीच पाहिजे.

कलावंतीण दुर्गा ट्रेकसाठी प्राथमिक माहिती :

– कलावंतीण दुर्गाची उंची 500 मीटर म्हणजेच साधारण 2300 फूट आहे.

– कलावंतीण दुर्ग चढताना मध्यम स्वरूपाच्या अडचणींची शक्यता उद्भवते.

– कलावंतीण चढण्यासाठी सहनशक्तीसह आवश्यकता लागते.

– पायथ्याशी असलेल्या गावात अन्न व पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

– जवळच्या प्रबलमाची गावात टेंट कॅम्पिंग शक्य आहे.

– प्रबळगड आणि इर्शाळगड ट्रेक एकत्र करू शकता.

(One Day Trek Plan at Kalavantin Durg  near Mumbai)

 

कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडापर्यंत कसे पोहोचाल?

– हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकावर उतरा.

– 5 मिनिटांच्या अंतरावरील एसटी डेपोत जा.

– येथून ठाकूरवाडीपर्यंत जाणारी बस किंवा रिक्षा पकडा.

– ठाकूरवाडीला पोहोचल्यानंतर प्रबळमाची पर्यंत आपण सहजपणे ट्रेक करू शकता.

 

कलावंतीण दुर्ग किंवा प्रबळगडावर राहण्या-खाण्याची सोय

– प्रबळमाचीवर खाण्याची सोय उपलब्ध आहे.

– प्रबळमाची बरेच गावकरी होमस्टे आणि कॅम्पिंगची सोय करून देतात.

– आपण आपले स्वत:चे जेवण देखील घेऊन जाऊ शकता.

– पायथ्याच्या गावात पाणी उपलब्ध आहे.

 

प्रबळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर गिर्यारोहण करण्यासाठी गिरीप्रेमी येत असतात. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.

प्रबळगडावर जात असताना वाटेत एक पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज लागतो. गडावर वास्तूंचे अवशेष आहेत. येथे एक गणेश मंदिर देखील आहे. तिथे भग्न अवस्थेतील नंदी आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील या मंदिरामध्ये पूजा करतात.

(One Day Trek Plan at Kalavantin Durg  near Mumbai)

हेही वाचा :