Packing Tips : वन-डे ट्रिपसाठी जाताय ? बॅगेत ‘या’ गोष्टी ठेवायला विसरू नका..

सहलीचा, प्रवासाचा प्लॅन बनताच सगळ्यात पहिलं काम असतं ते बॅग पॅक करण्याचं. पॅकिंग करताना आपण उत्साहाच्या भरात गरजेच्या नसलेल्या गोष्टीही पॅक करतो आणि कधीकधी हव्या असलेल्या गोष्टी पॅक करणं हमखास विसरतो. पॅकिंगशी संबंधित अशा काही टिप्स जाणून घ्या ज्यामुळे तुम्ही तुमचे पॅकिंग सहज करू शकाल.

Packing Tips : वन-डे ट्रिपसाठी जाताय ? बॅगेत 'या' गोष्टी ठेवायला विसरू नका..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:06 PM

Packing Tips : कुठेही बाहेर जाण्याचा,प्रवासाचा बेत आखला की उत्साहासोबतच पॅकिंग कसं करायचं, काय घ्यायचं आणि काय घेऊ नये असे प्रश्नही मनात येतात. काही लोक प्लान आखताच पॅकिंग करण्यास सुरवात करतात, तर काही लोक फक्त विचारातच हरवतात आणि पॅकिंग बाजूला राहतं. कितीही आधी पॅकिंग केलं तरी ऐनवेळेस एखादी गोष्ट राहून जातेच, असं आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत होतं. अशावेळी स्मार्ट पॅकिंगची गरज असते. जे लोक स्मार्ट पॅक करतात ते लोकं एखादी गोष्ट विसरण्याची शक्यता कमी असते.

पॅकिंग करताना, आपल्याला सर्वच गोष्टी पॅक करण्याची इच्छा असते पण बॅगही जास्त जड व्हायला नको असते. अशावेळी बॅग पॅक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे जात आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती दिवसांसाठी जात आहात. जर तुम्ही खूप दिवसांसाठी बाहेर जात असाल तर तुम्हाला खूप सामान पॅक करावे लागेल, पण जर तुम्ही फक्त एका दिवसासाठी जात असाल तर सहज, सोपं पॅकिंग कस करावं हे जाणून घेऊया.

1) स्नॅक्स आणि पाण्याची बाटली विसरू नका

जर तुम्ही फक्त एका दिवसासाठी कुठेतरी जात असाल तर तुम्हाला बाहेरचे अन्न जास्त खावेसे वाटणार नाही. अशा परिस्थितीत, तुमच्या एका दिवसाच्या सहलीसाठी तुम्ही घरूनच अन्न पॅक करून न्या. किंवा मग चिप्स, बिस्किटं असा खाऊ सोबत बाळगा. यासोबतच बॅगेत ज्यूसची आणि पाण्याची बाटली ठेवायला विसरू नका. या गोष्टी ठेवल्याने तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही कारण प्रवासादरम्यान अनेकवेळा आपल्याला खाद्यपदार्थ मिळत नाहीत, अशा परिस्थितीत स्नॅक्स आणि ज्यूस बॅगेत ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येईल. आणि उपाशीही रहावं लागणार नाही.

2) मेकअप प्रॉडक्ट्स अवश्य पॅक करा

कुठेही जायचे असल्यास, मुली त्यांचे संपूर्ण मेकअप किट सोबत ठेवतात.पण असे करण्याची चूक करू नका. नेहमी लागणारी मेकअप उत्पादने लहान बॉक्समध्ये ठेवा, जी तुमच्या एका दिवसाच्या प्रवासासाठी पुरेशी ठरतील. अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेकअप कॅरी करू शकाल आणि तुमची बॅगही जड होणार नाही. तुम्ही बेसिक मेकअप आयटमसह तुमचा लुक पूर्ण करू शकता.

3) चार्जर ठेवायला विसरू नका

तुम्ही एखादा तास बाहेर जा किंवा एखादा दिव, बॅगेत फोनचा चार्जर तर असलाच पाहिजे. बाहेर फिरताना, फोनचा वापर सर्वाधिक केला जातो, त्यामुळे बॅटरी देखील लवकर संपते. त्यामुळे बॅगेत चार्जर भरल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तसेच तुम्ही लॅपटॉप, कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन प्रवास करत असाल तर त्यांचाही चार्जर ठेवायला विसरू नका.

4) कपडे सगळ्यात महत्वाचे

फिरायला जाताना चांगले कपडे घालायला सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे कुठे जाणार त्या हिशोबाने कपड कॅरी करा. सतत हवामान बदलत असेल अशा ठिकाणी जात असाल तर तिथली माहिती पूर्णपणे जाणून घ्या. फिरताना तब्येतीची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे फिरायला जाताना अशी कोणतीही चूक करू नका, ज्यामुळे तुम्ही आजारी पडाल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.