Party Songs : पार्टी ऑन माय माईंड, न्यू इयर पार्टीसाठी फॉलो करा ‘ही’ प्ले-लिस्ट

या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन घरात करणार असाल तर ही प्ले लिस्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. (Party on My Mind, follow 'this' playlist for New Year party)

Party Songs : पार्टी ऑन माय माईंड, न्यू इयर पार्टीसाठी फॉलो करा 'ही' प्ले-लिस्ट
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 6:28 PM

मुंबई : कोरोना आला आणि सगळं जग ठप्प झालं, लॉकडाऊनमुळे गेले 8 ते 9 महिने आपण घरात अडकलेलो आहोत. आता अनलॉकमध्ये जग पूर्व पदावर येतय. पार्टी ,सण-उत्सव अगदी साध्या पद्धतीनं आपण साजरे केले. मात्र असं असलं तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागतसुद्धा साध्या पद्धतीन करण्याचं आवाहन आता सरकारकडून करण्यात येत आहे. यावर्षी आपण सगळी सणं उत्तमरित्या घरातच साजरी केली आहेत त्यामुळे या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन घरात करणार असाल तर ही प्ले लिस्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.

१. “इश्क तेरा तडपावे” पार्टी म्हटलं की पंजाबी गाण्यांशिवाय ती अपूर्णच असते. त्यामुळे सुखबीरचं “इश्क तेरा तडपावे” हे गाणं पार्टीमध्ये असायलाच हवं.

२. “बॉम डिगी बॉम बॉम” 2018 मध्ये रिलीज झालेला ‘सोनु की टिटू की स्विटी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. सोबतच या चित्रपटातील गाणीसुद्धा प्रचंड हिट झाली. त्यामुळे “बॉम डिगी बॉम बॉम” हे मस्त पार्टी साँग आहे.

३. “केअर नी करदा” नुकतच काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेलं “केअर नी करदा” या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील राजकुमार राव आणि नुसरतचा डान्स चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे अजूनही हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. हे गाणं प्ले-लिस्टमध्ये असायलाच हवं.

४. “बुर्ज खलिफा” अभिनेता अक्षय कुमारचा 2020 मध्ये रिलीज झालेला ‘लक्ष्मी’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला, सोबतच या चित्रपटातील गाणीसुद्धा चांगलीच फेमस झाली. “बुर्ज खलिफा” हे गाणं डान्स करायला भाग पाडणारं आहे.

५. “काला चष्मा” बार बार देखो या चित्रपटातील “काला चष्मा” हे गाणं अजूनही अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा हे गाणं नक्कीच आवडणार.

६. “अभी तो पार्टी शुरू हुई हैं” अभिनेत्री सोनम कुपूरच्या ‘खुबसुरत’ या चित्रपटातील “अभी तो पार्टी शुरू हुयी हैं या गाण्याशिवाय पार्टी पूर्ण होणं शक्य नाही. त्यामुळे बादशाहचं हे गाणं लागताच सगळ्यांमध्ये परत ऊर्जा संचारते. असं हे एनर्जी बुस्टर साँग पार्टीची शान वाढवणार हे नक्की.

७. “दिलबर” “दिलबर” या गाण्यात अभिनेत्री नोरा फतेहीची एनर्जी कमाल आहे. त्यामुळे अनेकांना हे गाणं चांगलंच आवडतं. हे गाणंसुद्धा प्ले लिस्टमध्ये नक्की ठेवा.

८. “आंख मारे” अभिनेत्री सारा अली खान आणि रणवीर सिंह यांच्या ‘सिंबा’या चित्रपटातील हे गाणं पार्टीसाठी परफेक्ट आहे.

९. “लिग्गी” सध्या रित्विझ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. सगळीकडेच त्याची गाणी ट्रेंडिगमध्ये आहेत. अशात “लिग्गी”, “उड गये” आणि “चलो चले” ही गाणी पार्टीत धमाल करण्यासाठी मदत करतील.

१०. “हाय रे मेरी मोटो” “हाय रे मेरी मोटो” हे पंजाबी गाणं परफेक्ट पार्टी साँग आहे. त्यामुळे या गाण्यासोबत तुम्ही पार्टीत खूप डान्स करू शकता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.