January Pradosh Vrat 2025: जानेवारी 2025 महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त
Shani Pradosh Vrat 2025: हिंदूधर्मानुसार, प्रदोष व्रताला भरपूर महत्त्व दिलं जातं. प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता निघून जाते त्यासोबतच तुमच्या जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत होते. 2025 मधील प्रदोष व्रत नेमकं कधी आहे ? त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे? आणि प्रदोष व्रताच्या दिवशी काय नियमांचे पालन केलं पाहिजेल चला जाणून घेऊया.
January Shani Pradosh Vrat 2025: हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व सांगितले जाते. प्रदोष व्रताबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी शिवपुराणामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत महिन्यातून दोनवेळा केले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी अनेकजण कठोर उपवास करतात आणि शंकराची विशेष पूजा केली जाते. ग्रंथानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराची विशेष पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सैभाग्य येते त्यासोबतच सकारात्मक उर्जा निर्माण होते.
प्रदोष व्रताच्या दिवशी शंकरासोबत देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी मागीतलेला नवस पूर्ण होतो आणि शंकर आणि पर्वती देवीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहाते. तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे आणि दुख:चा डोंगर कोसळला असेल ततर तुम्ही प्रदोष व्रत केल्यास फायदा होऊ शकतो. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला जानेवारी महिन्यातील पहिला प्रदोष व्रत केले जाते. चला तर जाणून घेऊया जानेवारी २०२५मधील पहिला प्रदोष व्रत कोणत्या तारखेला साजरा केले जाते?
जानेवारी २०२५मध्ये पहिला प्रदोष व्रत कधी आहे?
हिंदू कॅलेंजरनुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच 11 जानेवारीला सकाळी 8.21 वाजल्यापासून ते 12 जानेवारी सकाळी 6.33 वाजेपर्यंत प्रदोष व्रताची पूजा करू शकता. जानेवारी २०२५चा प्रदोष व्रत 11 जानेवारीला शनिवारी साजरी केली जाणार आहे, म्हणून यंदाच्या पहिल्या प्रदोष व्रताला शनि प्रदोष व्रत देखील म्हटले जाते. या दिवशी अनेकजण शनि देवाची देखील पूजा केली जाते.
शनि प्रदोष व्रताची पूजा शुभ मुहूर्त :
11 जानेवारी 2025 रोजी शनि प्रदोष व्रताचा मुहूर्त आहे. यंदाचा शनि प्रदोष व्रत प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळी 5.43 ते 8.26 पर्यंत असणार आहे. या व्रताच्या दिवशी शंकराची देवी पार्वतीची आणि त्यासोबतच शनिची पूजा केली जाते. शनि प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या आयुष्यामधील नकारात्मक उर्जा कमी होण्यास मदत होते. शनि प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते. प्रदोष व्रत केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य स्थीर राहाते आणि चिडचिड कमी होण्यास मदत होते.
शनि प्रदोष व्रताचे नियम :
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून शंकराची आणि पार्वती देवीची पूजा करावी.
शंकराची पूजा करताना चंदन, कापूर, बेलपत्र, धतुरा, गंगाजल, फळे, धूप या गोष्टींचा वापर करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी गरिबांना अन्नदान आणि आवश्यक वस्तू दान करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी सात्विक आहाराचे सेवन करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलणे टाळावे.