या ब्लड ग्रुपचे लोक खूपच चलाख असतात, त्यांची कामे चुटकीसरशी होतात
रक्तगटाचा स्वभावाशी देखील काही संबंध असतो का ? याचा उलगडा एका संशोधनात करण्यात आला आहे. काही विशिष्ट रक्त गटाची माणसे अधिक चतुर असतात असे या संशोधनाचे म्हणणे आहे.
बुद्धीमान असणे ही चांगली गोष्ट असते. परंतू चतुर आणि चलाख असणे हा वेगळाच गुण आहे. तुमच्या जीवनात असे लोक तुम्ही पाहीले असतील जे चलाखी करतात आणि आपले काम करुन घेतात. अशा लोकांचा एकच तीर अनेक लक्ष्यांना भेद करतो.ते फारसी मेहनत न करता आपले काम सहज पूर्ण करतात. Walden University ने केलेल्या एका अभ्यासात काही विशिष्ट रक्तगट असणारी माणसे जरा जास्त चतुर आणि चलाख असतात. असे लोक दुसऱ्यांकडून आपली कामे करुन घेण्यात पटाईत असतात. तर पाहूयात असे कोणते क्लेवर ब्लड ग्रुप आहेत.
Walden University ने केलेल्या अभ्यासात ए ब्लड ग्रुपचे लोक नेहमीच चतुर आणि चलाख असतात. असे लोक सर्वसाधारणपणे धैर्यवान स्वभावाचे असतात. ते सामाजिक मानदंडाचे पालन करीत आपले म्हणणे शांतपणे मांडतात. असे लोक दुसऱ्याच्या डोक्यात काय चालू आहेत ते चक्क वाचतात. आणि नंतर त्यांना सहज पटवून आपले काम साध्य करुन घेतात.
अशा ब्लड ग्रुपच्या लोकांना तुम्ही स्वार्थी देखील म्हणू शकता. असे लोक आधी नेहमीच स्वत:चाच विचार करतात. आणि आपल्या कामाचा विचार करतात. त्यानंतर ते दुसऱ्यांच्या बद्दल विचार करु शकतात.
जीवनाचा आनंद घेणारे
ए ब्लड ग्रुपवाले भावनिकदृष्ट्या खूपच बुद्धीमान असतात. असे लोक आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेत असतात. तर चांगले राजकारणी असू शकतात. अनेक राजकीय मुद्द्यांना तर ते सहज मॅनेज करु शकतात. परंतू कधी -कधी मात्र जिद्दी, ध्यैय्याने प्रेरित , अत्यंत संवदेनशील , निराशावादी आणि सहजपणे तणावात येणारे देखील असू शकतो.
( सूचना : ही माहिती बातम्यांवर आधारित आहे. यातील तथ्य प्रत्यक्षात तसेच असतील असे नाही. अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू या मागे नाही )