कोरोना काळाने बदलली लोकांची मानसिकता, नैराश्य-मानसिक तणावासारख्या समस्यांवर ‘बिनधास्त बोल’!

2020 वर्ष जरी संपूर्ण जगासाठी खूपच वाईट असल्याचे सिद्ध झाले, तरी यावर्षी काही गोष्टी चांगल्या देखील घडल्या आहेत.

कोरोना काळाने बदलली लोकांची मानसिकता, नैराश्य-मानसिक तणावासारख्या समस्यांवर ‘बिनधास्त बोल’!
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 12:43 PM

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. लोक नवीन अपेक्षांसह 2021 वर्षाचे स्वागत करत आहेत. 2020 वर्ष जरी संपूर्ण जगासाठी खूपच वाईट असल्याचे सिद्ध झाले, तरी यावर्षी काही गोष्टी चांगल्या देखील घडल्या आहेत. कोरोना विषाणू साथीच्या आजारातून लोकांना बरेच काही शिकायला मिळाले. यामध्ये घडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोक नैराश्यावर उघडपणे बोलू लागले (People understand seriousness of depression and mental health during corona pandemic).

वास्तविक, कोरोना संसर्गाच्या वेळी लोकांना घरात कैद व्हावे लागले होते, तेव्हा बरेच लोक नैराश्यात गेले. यापूर्वी, बर्‍याच लोकांना हे माहित नव्हते की औदासिन्य अर्थात डिप्रेशन हा एक मोठा आजार आहे आणि जर योग्य वेळी त्यावर उपचार केले गेले नाहीत तर तो लोकांचे प्राण देखील घेऊ शकतो. परंतु, लॉकडाऊन दरम्यान लोकांना याची जाणीव झाली आणि लोक हळूहळू याबद्दल उघडपणे बोलू लागले.

कलाकारांच्या आत्महत्यांनी खळबळ

वास्तविक, जेव्हा एकामागून एक अनेक कलाकारांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा नैराश्याविषयी लोक अतिशय गंभीरपणे बोलू लागले. यात समीर शर्मा, प्रेक्षा मेहता, मनमीत ग्रेवाल, आसिफ बसरा, सुशांत सिंह राजपूत अशा अनेक सिने कलाकारांचा समावेश होता. पैशाअभावी आणि कोणतेही काम नसल्यामुळे, हे कलाकार नैराश्यात गेले आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले गेले.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या बातमीने लोकांना सर्वात मोठा धक्का बसला होता. या बातमीने संपूर्ण देश हादरला. सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याचा शोध सध्या सुरु आहे. पण, सुरुवातीला त्यांची आत्महत्या नैराश्य प्रेरित असावी असे म्हटले गेले होते. सुशांत सिंह राजपूत बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्यावर उपचार घेत होता. पण शेवटी तो हरला आणि त्याने आत्महत्या केली असे म्हटले गेले (People understand seriousness of depression and mental health during corona pandemic).

मानिसिक आरोग्याकडे विशेष लक्ष

या बातमीनंतर लोक नैराश्य व मानसिक आरोग्यास गंभीरपणे विचारात घेऊ लागले. सामान्य माणसांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच नैराश्याबद्दल उघडपणे वक्तव्य करण्यात सुरुवात केली आहे. हळूहळू बर्‍याच लोकांनी स्वत:हून पुढे येत ते नैराश्यात आहेत आणि त्यांना मदतीची आवश्यकता आहे, असे बिनधास्त जाहीरपणे म्हटले.

न्यूज 18मधील एका वृत्तानुसार, मार्च ते ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान 43 टक्के लोकांना नैराश्याने ग्रासले होते. लॉकडाऊननंतर मानसिक आजाराच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत, लोक हळूहळू नैराश्याबद्दल बोलू लागले आणि या समस्येने त्रस्त असलेल्यांना याबद्दल समजले. पूर्वी या आजाराबद्दल बोलताना लोक संकोच बाळगायचे. परंतु, आता लोक या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, इतरांनाही याविषयी जागरूक करत आहेत.

(People understand seriousness of depression and mental health during corona pandemic)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.