मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!

मधुमेही लोकांनी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्‍यक असते. काही पदार्थांमुळे मधुमेहाची पातळी आणखी वाढू शकते. त्यामुळे कुठल्या गोष्टी मधुमेही लोकांना टाळाव्या, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!
मधुमेहाची समस्या
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:33 PM

मुंबई : ताणतणाव, बदलती जीवनशैली (Lifestyle) खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसन आदी विविध कारणांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात मधुमेहाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. मधुमेहींची वाढती संख्या पाहता भारताला मधुमेहींची राजधानी म्हटले जात आहे. पुर्वी फक्त प्रगत देशांमधील समजला जाणारा मधुमेह (diabetes) हा आजार आता भारतात सर्वत्र पसरत चालला आहे. याला प्रामुख्याने चुकीच्या आहार सवयी कारणीभूत आहेत. अनेक पदार्थ असे असतात ज्यांच्या सेवनामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) वाढत असते. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारात काही पदार्थांना वगळने आवश्‍यक असते. कुठले पदार्थ खाण्यापासून वाचले पाहिजे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

रताळे

रताळ्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे याचे ग्लाईसेमिक इंडेक्समध्ये वाढ होत असते. रताळ्यांमध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाणदेखील जास्त असते. यामुळे मधुमेही लोकांच्या आरोग्यासाठी हे घातक असते.

हिरवे वाटाणे

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी हिरवे वाटाणे खाणे टाळले पाहिजे. वाटाण्यांमध्येही कार्बोहाइड्रेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे मधुमेहींची साखरेची पातळी आणखीन वाढू शकते.

मका

भारतासारख्या देशात मक्याचे अधिक सेवन केले जात असते. विविध अन्न घटकांमध्ये मका वापरला जात असतो. परंतु मक्यातदेखील मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहींनी मका खाणे टाळायल हवे.

फास्ट फूड

अनेक लोक प्रक्रिया केलेले अन्न तसेच फास्ट फूडचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. परंतु हे त्याच्या आरोग्यासाठी धोकेदायक ठरु शकते. विशेषत: मधुमेही लोकांनी याचे सेवन करणे टाळलेच पाहिजे. बर्गर, पिझ्झा, मोमोज, फ्राइड घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहींच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतो.

पिष्टमय भाज्या

पिष्टमय भाज्या मधुमेहींसाठी धोकेदायक ठरु शकतात. त्यामुळे मधुमेहाची समस्या असलेल्यांनी या भाज्यांपासून स्वत:ला लांब ठेवावे. वाटाणे, मकई आदींमध्ये पिष्टमय घटकांचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका नाकारता येत नाही.

द्राक्ष आणि चिकू

मधुमेही लोकांनी द्राक्ष आणि चिकू या दोन्हींचे सेवन करणे टाळायला हवे. या फळांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढीस लागत असते. त्यामुळे याचे सेवन करणे मधुमेही लोकांसाठी घातक ठरु शकते.

संबंधित बातम्या

आग्रा गेल्यावर ‘या’ पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा; शास्त्र असतं ते!

कोण म्हणतं सॉरी म्हटल्यानं प्रश्‍न संपतात… तुमच्या नात्यावर असा होईल दुष्परिणाम

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अति थंड पाण्याचे सेवन करणे टाळाच, वाचा महत्वाचे!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.