IPL 2023 : एम. एस. धोनीचे हे 4 गुण घ्या, आयुष्यात तुम्हीही होताल यशस्वी!

तुम्हालाही धोनीसारखी पर्सनॅलिटी करायची असेल किंवा त्याच्यासारखं बनायचं असेल तर त्याच्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील. 

IPL 2023 : एम. एस. धोनीचे हे 4 गुण घ्या, आयुष्यात तुम्हीही होताल यशस्वी!
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 5:39 PM

प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य एखाद्या सेलिब्रेटी सारखं किंवा आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीसारखं असावं. कित्येक लोक तर त्यांच्या आवडत्या व्यक्तीला किंवा सेलिब्रेटीला फॉल करून त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करत असतात. तर यामध्ये तुम्ही एमएस धोनीचे फॅन असाल तर तुम्हालाही धोनीसारखी पर्सनॅलिटी करायची असेल किंवा त्याच्यासारखं बनायचं असेल तर त्याच्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील.

आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायला शिका

एमएस धोनी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद एकदम मनसोक्त घेत असतो. तो त्याचे भविष्य आणखी चांगले होण्यासाठी आजही काम करतोय. धोनीचे हे तत्व प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. कारण तुम्हालाही तुमचे भविष्य सुधरवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

नेहमी तुमचं बेस्ट द्या

धोनी त्याच्या प्रत्येक खेळीत तो नेहमी त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या याच कौशल्य आणि मेहनतीने देशाला विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनी केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर एक खेळाडू म्हणूनही त्याने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपणही धोनीसारखं सर्वोत्तम द्यायला हवे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या करिअर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच होईल.

स्वत:मधील कमतरता जाणून घ्या

धोनी हा असा व्यक्ती आणि खेळाडू आहे जो नेहमी स्वतःच्यातील कमतरता  ओळखण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात ना माणूस चुकांमधून शिकतो, अगदी तसंच आपणही कुठे चुकतो किंवा आपल्यात काय कमतरता आहे ते ओळखले पाहिजे.

पुढे जात राहा

धोनीनेही त्याच्या आयुष्यात संघर्ष केला आहे. त्यानेही अनेक संकटांचा, अडचणींचा सामना केला आहे. पण यावेळी तो खचला नाही किंवा Give up केलं नाही. तो नेहमी काहीना काही पुढे जात राहीला. त्यामुळे आज तो एवढा यशस्वी आहे. त्यामुळे तुम्हीही धोनीची ही सवय नक्कीच अंगिकारा. त्यामुळे तुमच्याही आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.