व्हॅलेंटाईन वीकमध्ये पार्टनरसोबत फिरण्यासाठी साऊथ इंडिया मधील ही ठिकाणे सर्वोत्तम…
पार्टनरसाठी व्हॅलेंटाइन वीक खास करण्यासाठी त्यांना भेटवस्तू देणे आणि आउटिंग प्लॅन करतात. या पार्श्वभूमीवर या व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत साऊथ इंडिया मधील या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता.

फेब्रुवारी महिना म्हंटल की काही लोकं आतुरतेने वाट पाहत असतात कारण या काळात व्हॅलेंटाईन वीक मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो, ज्याची सुरुवात रोज डेपासून होते. प्रेमासाठी खास दिवस असणं गरजेचं नसलं तरी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या तारखेपर्यंत चालणाऱ्या व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये अनेक कपल्स त्यांच्या रोजच्या धावपळीच्या व्यस्त कामातून आपल्या पार्टनरसाठी थोडा वेळ नक्कीच काढतात. तसेच या व्हॅलेंटाइन वीकमध्ये पार्टनर एकमेकांना भेटवस्तू देतात आणि एकत्र फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही देखील तुमच्या पार्टनरसोबत दक्षिण भारतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती ठिकाणं…
साऊथ इंडियामध्ये एक्सप्लोर करण्याची ही आहेत सुंदर ठिकाणं
कूर्ग
साऊथला फिरायला जाण्यासाठी कुर्ग हा चांगला पर्याय आहे. ही जागा एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. तसेच तुम्हाला सूर्यास्ताचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही कूर्ग शहराला भेट द्या. कारण इथून आजूबाजूला उंच उंच डोंगर आणि दऱ्या आहेत, जेथून सूर्यास्त एकदम सुंदर दिसतो. याव्यतिरिक्त तुम्ही ॲबी धबधबा, भागमंडला किंवा इरपू धबधब्याला भेट देऊ शकता. दोन्ही धबधबे अतिशय सुंदर आहेत. तुम्ही नागरहोल राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा प्लॅन देखील बनवू शकता. याशिवाय, कावेरी रिव्हर राफ्टिंग, पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य, चेट्टाल्ली आणि मंडलापट्टी व्ह्यू पॉईंट सारख्या सुंदर ठिकाण व्हॅलेंटाईन डे निमित्त एक्सप्लोर करू शकता. अशातच तुम्ही ट्रेकिंग लव्हर असाल तर ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी कोपट्टी हिल्स ट्रेक आणि निशानी मोटे येथेही जाण्याचा बेत आखू शकता.
उटी
उटी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी इथे जाऊ शकता. यात तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी अगदी शांत आणि गर्दीचे नसलेल्या ठिकाणी जाऊन तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता. यासाठी तुम्ही उटी येथील निलगिरी माउंटन रेल्वे लाइनला भेट देऊ शकता. याव्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शांत आणि निसर्गाने भरलेल्या ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर उटी लेकला जाऊ शकता. येथे तुम्हाला बोटिंगला जाण्याची ही संधी मिळू शकते. याशिवाय दोड्डाबेट्टा शिखर आणि कामराज सागर तलाव अशी ठिकाणे ही तुम्ही एक्सप्लोर करू शकता.
मुन्नार
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही मुन्नार हे ठिकाण एक्सप्लोर करू शकता. तसेच तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही इराविकुलम राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकता. याव्यतिरिक्त मुन्नार टी म्युझियम, पोथामेडू व्ह्यूपॉइंट, अट्टुकल धबधबा, न्यायमाकड धबधबा आणि देवीकुलम सारख्या सुंदर ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता. देवीकुलम हे मुन्नारमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथील सीता देवी तलाव हे अतिशय प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.