Year End Party | सरत्या वर्षाची पार्टी घरच्या घरी आयोजित करताय? मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा!

तुम्ही देखील पार्टीसाठी काय बनवावे या संभ्रमात आहात का? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला चटपटीत ‘चीझ पोटॅटो रोल्स’ची रेसिपी सांगणार आहोत.

Year End Party | सरत्या वर्षाची पार्टी घरच्या घरी आयोजित करताय? मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा!
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 12:30 PM

मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागताला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देखील वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. कोरोनाची धास्ती असल्याने यंदा बहुतेकांनी घरच्या घरीच सेलिब्रेशनच्या योजना आखल्या आहेत. दरवर्षी बाहेर जाऊन होणाऱ्या या छोटेखानी पार्ट्या यावेळेस मात्र घरीच आयोजित कराव्या लागणार आहेत. अशावेळी या पार्टीसाठी काय मेन्यू असावा?, या विचारात सगळेच गुंतले आहे. नवनवीन, चटपटीत पदार्थांच्या शोधात पुस्तके आणि इंटरनेट धुंडाळले जात आहे. तुम्ही देखील पार्टीसाठी काय बनवावे या संभ्रमात आहात का? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला चटपटीत ‘चीझ पोटॅटो रोल्स’ची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही पार्टी स्टार्टर म्हणून बनवू शकता (Potato Cheese Rolls recipe as a starter for year end party).

चीझ पोटॅटो रोल्स बनवण्यासाठी साहित्य :

उकडून स्मॅश केलेले बटाटे – 4

काळीमिरी पूड – अर्धा चमचा

मैदा – अर्धा कप

ब्रेड क्रम्ब्स – पाऊण कप

तेल (तळण्यासाठी)

स्टफिंग (सारणासाठी) साहित्य :

किसलेले मोझरेला चीझ – 2 मोठे चमचे

किसलेले प्रोसेस चीझ – 2 मोठे चमचे

गार्लिक-चिली सॉस – 2 चमचे

चीझ पोटॅटो रोल्स (Potato Cheese Rolls) बनवण्याची कृती :

– उकडून स्मॅश केलेले बटाटे, काळीमिरी पूड आणि चवीनुसार मीठ याचे एकत्र मिश्रण करून घ्या.

– या तयार मिश्रणाला 6 समान भागांमध्ये विभागून, त्या विभागलेल्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या.

– एका भांड्यात किसलेले मोझरेला चीझ, किसलेले प्रोसेस चीझ घेऊन त्यात 2 चमचे गार्लिक-चिली सॉस घालून, त्या मिश्रणाचे 6 समान गोळे तयार करा.

– आता बटाट्याच्या मिश्रणाच्या गोळ्यांची पारी बनवून त्यात चीझच्या मिश्रणाचे गोळे भरा. (मोदकात सारण भरतात तसे) या गोळ्यांना हलक्या हातांनी लंब गोलाकृती आकार द्या.

– एका वाटीत मैदा आणि पाणी मिसळून त्याचे पातळ बॅटर तयार करा. त्याचबरोबर एका पसरत थाळीत ब्रेड क्रम्ब्स पसरून घ्या.

– बटाटा आणि चीझने बनवलेलं रोल्स या मैद्याच्या पातळ बॅटरमध्ये बुडवून, ब्रेड क्रम्ब्समध्ये चारही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्या.

– हे रोल्स मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा आणि सॉससह गरमागरम सर्व्ह करा.

पार्टीच्या सुरुवातीस बच्चे कंपनीपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे कुरकुरीत, चटपटीत चीझ पोटॅटो रोल्स नक्की आवडतील. चीझ पोटॅटो रोल्स सर्व्ह करताना सोबत मेयॉनीज किंवा टोमॅटो सॉस देण्यास विसरू नका.

(Potato Cheese Rolls recipe as a starter for year end party)

हेही वाचा :

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.