World Kidney Day 2021 : किडनीसाठी लाभदायी आहे राजमा, अनेक पोषक तत्वांचा आहे खजिना

किडनी बीन्समध्ये असलेले फायबर वजन नियंत्रणास मदत करते. कारण हे कॅलरी न वाढवता पोट भरण्याचे कार्य करते. (rajama is beneficial for the kidneys, it contains many nutrients)

World Kidney Day 2021 : किडनीसाठी लाभदायी आहे राजमा, अनेक पोषक तत्वांचा आहे खजिना
किडनीसाठी लाभदायी आहे राजमा
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 4:29 PM

मुंबई : प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा राजमा हा खजिना आहे. यास किडनी बिन्स म्हणूनही ओळखले जाते. भारतात बहुतेक लोकांच्या आवडत्या पदार्थात राजमा-तांदूळ यांचा समावेश असतो. उकळणे, कबाब बनवणे, भाजणे अशा इतरही अनेक प्रकारे आपण ते खाऊ शकता आणि केवळ किडनीच नाही तर हे खाल्ल्याने आपले एकूण आरोग्य चांगले राहते. किडनी बीन्समध्ये असलेले फायबर वजन नियंत्रणास मदत करते. कारण हे कॅलरी न वाढवता पोट भरण्याचे कार्य करते. म्हणून जर आपण वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर राजमा आपल्या आहारात समाविष्ट करा. (rajama is beneficial for the kidneys, it contains many nutrients)

हृदयासाठी फायदेशीर

किडनी बिन्स म्हणजे राजमा शरीराची खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामध्ये उपस्थित मॅग्नेशिअम रक्तदाब पातळी कायम ठेवते.

मजबूत हाडांसाठी

वर नमूद केल्याप्रमाणे किडनी बिन्समध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशिअम समृद्ध असतात. जे हाडांची ताकद टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

डायझेशन सुधारते

राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवे असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणे अधिक चांगले आहे.

मधुमेह रूग्णांसाठी लाभदायी

फायबरने समृद्ध असलेली प्रत्येक गोष्ट मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर ठरते. त्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मायग्रेनवर उपयुक्त

राजमा मायग्रेनची समस्या सोडवू शकते. त्यात उपस्थित फोलेट आणि मॅग्नेशिअम केवळ मेंदूची क्षमता वाढवणार नाही तर मायग्रेनसारख्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यास उपयुक्त ठरेल.

मेंदू, मज्जासंस्थेसाठी फायदेशीर

हे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात उपस्थित थायमाइन मेंदूची क्षमता वाढवते आणि अल्झायमर सारख्या आजारांना बरे करण्यास देखील मदत करते.

हे ही लक्ष ठेवा

सॅलड, भाजीच्या स्वरूपात राजमा खाण्याचे फायदे तेव्हा मिळतील जेव्हा आपण ते योग्य प्रमाणात आणि योग्यरीत्या शिजवाल. (rajama is beneficial for the kidneys, it contains many nutrients)

इतर बातम्या

“आता विष पिणार नाही तर पाजणार”, मराठा आरक्षणावरुन उदयनराजे कडाडले

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आणखी एक स्वप्न, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूसारखं बनायचंय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.