Health | अकाली वृद्धत्वाला कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, वेळीच व्हा सावध!
आता ऐन पंचविशीतच आपले केस पांढरे होऊ लागतात. वाढत्या ताणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तर आरोग्याच्या इतर समस्याही वाढू लागल्या आहेत.
मुंबई : आपल्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो. त्यातही वयाच्या एका टप्प्यानंतर आपल्या त्वचेचे आरोग्य देखील खालावत जाते. सुरकुत्या, बारीक रेषा, पांढरे केस यासह आरोग्याच्या देखील अनेक समस्या उद्भवू लागतात. मात्र, सध्या आपल्या धावत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे वृद्धत्वाची मर्यादा कमी झाली आहे. आता ऐन पंचविशीतच आपले केस पांढरे होऊ लागतात. वाढत्या ताणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तर आरोग्याच्या इतर समस्याही वाढू लागल्या आहेत (Reasons behind premature aging problems).
याला कारणीभूत आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयीच असतात. आपल्याला अशा काही सवयी असतात की, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे वेळेपूर्वी दिसू लागतात. आम्ही आपल्याला अशा काही दैनंदिन सवयी सांगणार आहोत ज्या तुम्हाला वेळेआधीच म्हातारे बनवतात आणि आपल्याला त्या बदलण्याची आवश्यकता आहे.
स्ट्रॉने पेय पिणे
जेव्हा आपण स्ट्रॉने काही पेय पितो, तेव्हा आपल्या ओठ ताणलेली जातात. यामुळे चेहर्यावर अकाली रेषा आणि सुरकुत्या येतात. म्हणून स्ट्रॉऐवजी ग्लास किंवा कपमध्ये पेय पिणे अधिक चांगले ठरेल.
जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक
जंक फूडमध्ये भरपूर ट्रान्स फॅट, मीठ आणि साखर असते. त्यात पौष्टिक मूल्य अजिबात नसतात. जंक फूड शरीरातून कोलेजेनचे प्रमाण कमी करते. कोलेजेन हा घटक चेहर्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. सोडा आणि कोल्ड्रिंकने देखील चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या वाढतात (Reasons behind premature aging problems).
जास्त प्रमाणात मद्यपान
काही अभ्यासांनुसार, जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांच्यात अकाली वृद्धावस्थेची लक्षणे आढळतात. मद्यपान जास्त केल्याने डोळ्यांखाली काळे डाग पडतात, तसेच त्वचेवरील सुरकुत्या आणि चेहर्यावर डिहायड्रेशन दिसू लागते.
पोटावर झोपणे
झोपेमुळे शरीराला ऊर्जा मिळते, परंतु जर आपण पोटावर उपडी झोपी गेलात, तर आपल्याला म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसू शकतात. अॅस्थेटिक सर्जरी या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, पोटावर झोपल्यामुळे चेहऱ्यावर थेट दाब पडतो, ज्यामुळे सुरकुत्या तयार होण्यास सुरुवात होते. म्हणून झोपेची पद्धत बदला.
झोप पूर्ण न होणे
झोपेच्या अभावामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. झोप न आल्यामुळे संपूर्ण दिनक्रम खराब होतो. त्याचा शरीरावरही परिणाम होतो. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरच्या अभ्यासानुसार, ज्यांना पुरेशी झोप येत नाही, अशा लोकांच्या चेहऱ्यावर अधिक सुरकुत्या दिसल्या आहेत. यासह, ताणतणाव देखील एक प्रमुख कारण मानले जाते.
(Reasons behind premature aging problems)
हेही वाचा :
‘कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…https://t.co/naHP5enUPp#coronavirus #HeartProblems #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020