Tea | ग्रीन-ब्लॅक टी नव्हे, दुधाच्या चहाने देखील होते वजन कमी! जाणून घ्या याचे फायदे…

ग्रीन टी किंवा हर्बल टीऐवजी आपण आपला नियमित चहा वजन कमी करण्यासाठी वापरू शकता. नेहमीचा दूधयुक्त चहा प्यायल्याने देखील तुम्ही निरोगी राहू शकता.

Tea | ग्रीन-ब्लॅक टी नव्हे, दुधाच्या चहाने देखील होते वजन कमी! जाणून घ्या याचे फायदे...
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 11:03 AM

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवन शैलीत आपल्या सर्वांना स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आवडते. यासाठी आपण नियमित सकाळ दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी, ग्रीन आणि हर्बल चहा पिण्याला पसंती देतो. वजन कमी करू इच्छित असणारे कोणीही सहासा दुधाचा चहा घेत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दूध. दूध हा चरबीयुक्त पदार्थ आहे, जो आपल्या शरीरातील चरबी वाढवते (Regular milk tea will help you to reduce weight).

मात्र, ग्रीन टी किंवा हर्बल टीऐवजी आपण आपला नियमित चहा वजन कमी करण्यासाठी वापरू शकता. नेहमीचा दूधयुक्त चहा प्यायल्याने देखील तुम्ही निरोगी राहू शकता. मात्र, हा दुधाचा चहा बनवताना काही खास गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया, कसा बनवायचा हा दुधाचा चहा ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल…

चहा बनवण्यासाठी लगणारे साहित्य :

– 1 कप पाणी

– 1 चमचा कोका पावडर

– अर्धा चमचा चहा पावडर

– अर्धा इंच आले

– दालचिनी

– अर्धा चमचा गूळ

– अर्धा कप दूध

चहा बनवण्याची पद्धत :

एका भांड्यात 2 कप पाणी घ्या. त्यात अर्धा इंच आले किसून घाला. त्यात अर्धा इंच दालचिनी घाला आणि चांगल्याप्रकारे उकळवा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा चहाची पावडर, दूध, अर्धा चमचा गूळ, अर्धा चमचा कोका पावडर घाला आणि उकळी येऊ द्या (Regular milk tea will help you to reduce weight).

नेहमीच्या चहापेक्षा ‘हा’ चहा कसा वेगळा ठरेल?

आपण घरात नियमित बनवत असलेल्या चहात जास्त प्रमाणात दूध घालतो तर, त्यात पाणी खूप कमी असते. हा चहा प्यायल्याने आपले वजन कमी होत नाही. तर या चहामध्ये साखर जास्त असते, ज्यामुळे शरीरात कॅलरीचे प्रमाण जास्त वाढते. परंतु, या स्पेशल चहामध्ये दुधाचे प्रमाण खूप कमी आहे. याशिवाय साखरेऐवजी गूळ वापरला गेला आहे. तसेच, विविध प्रकारचे मसाले देखील टाकले गेले आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

चहाचे फायदे :

– आपण दिवसातून एक किंवा दोनदा हा चहा पिऊ शकता. रिकाम्या पोटी हा चहा पिणे टाळा. न्याहारीनंतर तुम्ही ते पिऊ शकता.

– यात असलेल आले आणि दालचिनी चयापचय वाढवण्याचे कार्य करते. तसेच, आपले वजन कमी करते आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

– कोका पावडरमध्ये फायटोन्यूट्रिएंटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील साखर आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

– एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, कोका पावडर सेवन केल्याने तुमचे चयापचय वाढते आणि भूक नियंत्रित होते.

– याशिवाय दुधामुळे तुमची भूक देखील कमी होते. गुळामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते.

(Regular milk tea will help you to reduce weight)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.