अरेंज मॅरेज करताय? मग पार्टनरला जरुर विचारा ‘हे’ 4 प्रश्न

जर तुम्ही अरेंज मॅरेज करणार असाल तर तुमच्या भावी जोडीदाराला काही प्रश्न आधीच विचारा. कारण तुम्ही स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडू शकाल.

अरेंज मॅरेज करताय? मग पार्टनरला जरुर विचारा 'हे' 4 प्रश्न
partner
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 5:28 PM

Arrange Marriage Ask 4 Question : लग्न करणे हा मुलगा आणि मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यातच जर काहींना त्याच्या जोडीदाराबद्दल आधीच माहित असेल म्हणजेच प्रेमविवाह करत असतील तर त्यांना या नात्याबद्दल आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल आधीपासून बरेच काही माहित आहे. पण जेव्हा अरेंज मॅरेजचा प्रश्न येतो तेव्हा अनेकदा लोकांना त्यांच्या भावी जोडीदाराविषयी सर्व काही माहीत नसते. कारण यात मुला- मुलीचे आई-वडील आणि घरातील इतर मोठे व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य जीवनसाथीची निवड करत असतात. पण लग्न करणाऱ्या व्यक्तीला आपल्या जोडीदारा विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण लग्न म्हणजे आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन असतं. भविष्यात नातं घट्ट ठेवण्यासाठी तुम्ही पार्टनरला काही प्रश्न विचारायला हवेत जेणेकरून एकमेकांना समजून घेऊन योग्य निर्णय घेऊ शकाल.

लग्न हे एक असे बंधन आहे ज्यात दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र बांधल्या जातात. तसेच अरेंज मॅरेज मध्ये अशी अनेक लग्नं आहेत जी यशस्वी होतात, पण काही नाती मध्येच तुटतात कारण यात जोडीदाराला समजून न घेणे, एकमेकांचा आदर न करणे अशी अनेक कारण आहेत जी अनेकांचे वैवाहिक आयुष्य अर्ध्यावरच थांबते. त्यामुळे जर तुम्ही लग्न करणार असाल तर तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला काही प्रश्न जरूर विचारा.

सर्वप्रथम हा प्रश्न विचारणे महत्त्वाचे

प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलांचे वैवाहिक आयुष्य सुखाचे जावे यासाठी स्वतः त्यांच्या मुलांसाठी योग्य जोडीदार निवडत असतात. त्यातच मुलांसाठी जगातील सर्वोत्तम जोडीदार शोधण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, पण अरेंज मॅरेज मध्ये लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्तीची संमती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात, त्यांना पहिला प्रश्न विचारावा की ते या लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे का आणि त्याच्यावर कोणताही दबाव नाही ना ? अनेकदा कौटुंबिक दबावाखाली मुलगा किंवा मुलगी लग्न करतात, त्यानंतर काही दिवसात त्या नात्याचं भवितव्य सुरक्षित करणं अवघड होऊन बसतं.

लग्नानंतर करिअर कसे असेल?

आजकाल बहुतांशी मुलीही नोकरी करत असतात, त्यामुळे बहुतेक मुलींनी लग्नाआधी त्यांच्या जोडीदाराला हा प्रश्न विचारला पाहिजे की, जर त्यांना त्यांचे करिअर करायचे असेल किंवा सध्या ते करत असलेली नोकरी लग्नानंतर सुद्धा करायची असेल, तर त्यांच्या जोडीदाराचा नोकरीबद्दल काय विचार आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण लग्नानंतर अनेक वेळा जबाबदाऱ्या, जोडीदार आणि कुटुंब यामुळे मुलींना करिअरमध्ये तडजोड करावी लागते.

तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या काय आहेत अपेक्षा?

अरेंज मॅरेजमध्ये लग्नाआधी मुलगा आणि मुलगी या दोघांनीही हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्या भावी जोडीदाराला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे, म्हणजेच त्यांच्या मनात त्यांच्या जोडीदाराविषयी काय प्रतिमा आणि अपेक्षा आहेत. यावरून त्यांची विचारसरणी तुम्हाला सकारात्मक पद्धतीने लागू पडते की नाही हे कळेल. यामुळे तुम्हाला एकमेकांचे जोडीदाराविषयी असलेल्या अपेक्षा समजतील आणि विचारही.

‘या’ आवडी-निवडींबद्दल जाणून घेणं गरजेचं

लग्नानंतर, कपड्यांच्या रंगाची निवड किंवा भेट देण्याच्या आवडत्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ असतो, परंतु तुमच्या जोडीदाराची खाण्यामध्ये कोणती पसंती आहे, म्हणजेच त्याला शाकाहारी की मांसाहारी आवडते हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय, तो धूम्रपान करतो की मद्यपान करतो हे देखील विचारा आणि जर होय, तर किती प्रमाणात. या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडू शकाल.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.