घरगुती उपाय करून कोरोनाची लक्षणे दूर करा; जाणून घ्या काय आहेत प्रभावी उपाय
काही घरगुती उपायांच्या साहाय्याने तुम्ही कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करू शकता. (Relieve corona symptoms with home remedies; know what are the effective remedies)
मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान अजून कमी झालेले नाही. या विषाणूने आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज चार हजारांहून अधिक लोकांचे मृत्यू जात आहेत. देशातील हे मृत्यूचे तांडव कधी थांबणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अर्थात विषाणू संसर्गाची काळजी भलतीच वाढली आहे. कोरोना प्रतिबंधक लसी आल्या, मात्र देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे प्रमाण फारच कमी आहेत. त्यामुळे सध्यातरी खबरदारी हाच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास आणि संसर्गावर मात करण्यास सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला झालेल्या कोरोना लागणची लक्षणे सौम्य असतील, तर तुम्ही विषाणूवर सहजासहजी घरगुती उपायांनीच मात करू शकाल. काही घरगुती उपायांच्या साहाय्याने तुम्ही कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करू शकता. (Relieve corona symptoms with home remedies; know what are the effective remedies)
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोक बिनधास्त वावरतात. मात्र त्यानंतरही अनेकांना विषाणूची लागण होत आहे. त्यामुळे विषाणूला हलक्यात घेऊन चालणार नाही. अनेक लोक ताप, खोकला आणि सर्दी अशा सामान्य लक्षणांना सामोरे जात आहेत.
हे घरगुती उपाय करा
– सौम्य लक्षणांवर काढा प्या. हा एक सर्वोत्तम उपाय आहे. – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, एखाद्या व्यक्तीस सर्दी, खोकला आणि हलका स्वरुपाचा ताप जाणवत असेल तर ताबडतोब काढा पिण्यास सुरूवात करा. – काढा करण्यासाठी आल्याचे तुकडे करून ते पाण्यात उकळवा. नंतर त्यात तुळशीची पाने घाला आणि हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा प्या.
ताजे अन्न खा
– जर आपल्याला सर्दी, खोकला किंवा थकवा येत असेल तर फक्त ताजे, शिजवलेले गरम जेवण घ्या. – जेवणात मीठ आणि तेल न घालता मूगाच्या डाळीचे सूप प्या. – गरजेपेक्षा अधिक खाऊ नका. – कोरोनाची लक्षणे टाळण्यासाठी शक्यतो रात्री सात वाजण्याच्या आधी जेवा. त्यामुळे रिकव्हरी अर्थात कोरोनातून वेळीच बरे होता येते.
या मसाल्यांचा वापर करा
– जर तुम्हाला कधी ताप, थकवा, सर्दी, खोकला येत असेल तर दालचिनी, मिरपूड, वेलची आणि लवंग यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. – जेवणात हळद आणि आले मिसळल्यानेही मोठा आराम मिळतो. यामुळे आपल्याला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास झाला असेल तर त्यापासून लवकरच आराम मिळेल. – आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या मसाल्यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करण्याची प्रचंड क्षमता आहे.
या भाज्या खा
– हलकीशी सर्दी झाल्यास भाज्या खाण्यास सुरुवात करा. – लक्षात ठेवा की भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या पाहिजेत. – कच्ची कोशिंबीर आणि भाज्या टाळा. – कडू कारल्याचा जेवणात समावेश करा. – काही दिवसांसाठी वांगे, टोमॅटो, बटाटा यांचे सेवन कमी करा. – धूम्रपान आणि मद्यपान टाळा. (Relieve corona symptoms with home remedies; know what are the effective remedies)
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
LIC च्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1302 रुपये जमा करून मिळवा 63 लाख, जाणून घ्या…#bestinvestmentscheme #highreturnsscheme #licjeevanumangpolicy #LICPolicyhttps://t.co/XjXaD3bV53
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
इतर बातम्या
आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा, जाणून घ्या…
मुलं आपली, जबाबदारी सर्वांची, कोरोनानं छत्र हरपलेल्या मुलांच्या मदतीसाठी ‘इथे’ करा संपर्क