Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!

| Updated on: Mar 03, 2021 | 11:33 AM

आपल्या सर्वांना बहुदा कोरियन ब्युटी हा प्रकार माहित असेल. जगभरातील अनेक महिला या कोरियन ब्युटी टिप्सशी सहमत आहेत. त्यांचा वापर करून, त्वचेवर एक वेगळीच चमक दिसते.

Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना बहुदा कोरियन ब्युटी हा प्रकार माहित असेल. जगभरातील अनेक महिला या कोरियन ब्युटी टिप्सशी सहमत आहेत. त्यांचा वापर करून, त्वचेवर एक वेगळीच चमक दिसते. याने इतका फरक दिसून येतो की, आपण एखाद्याच्या चेहर्‍यावरून वयाचा अंदाज देखील लावू शकणार नाहीत (Rice Face pack Korean beauty tips for healthy and glowing skin).

प्रत्यक्षात, हे खूप कठीण आहे आणि असे नाही की, कोरियन ब्युटी ट्रीटमेंटमध्ये वृद्धत्व लपवण्यासाठी विविध उत्पादने आणि उपचार घेतले जातात. परंतु, यात फक्त एकच गोष्ट वापरली जाते, जी आपल्या प्रत्येकाच्या घरात अगदी सहज सापडते.

होय, आम्ही भाताबद्दल बोलत आहोत, जो आपल्या घरात सहज उपलब्ध असतो. आपण भारतीय आपल्या नियमित आहारात भाताचे सेवन करतो. बर्‍याच लोकांचे जेवण भाशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या घरी तांदळाचे बरेच विविध प्रकार बनवले जातात, परंतु आपणास माहित आहे की त्याचा वापर केवळ अन्नापुरता मर्यादित नाही तर, आपण तो आपल्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील वापरु शकता.

याच्या वापरामुळे आपल्या त्वचेवरील डाग व स्पॉट मार्क्स काही दिवसांतच नाहीसे होतील. तसेच, भात आपल्या चेहर्‍यावरील कोरडेपणा कमी करेल आणि त्वचा स्वच्छ करेल. ज्यामुळे आपला चेहरा चमकदार दिसेल (Rice Face pack Korean beauty tips for healthy and glowing skin).

राईस फेस पॅक तयार करण्याची पद्धत जाणून घ्या :

कच्चे तांदूळ कमीतकमी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून, त्याची घाण पूर्णपणे स्वच्छ करावी. नंतर तांदळात पाणी घाला आणि ते शिजवा, जसे आपण सहसा खाण्यासाठी भात शिजवता. तांदूळ एक ते दोन शिट्ट्यामध्ये शिजवला जातो, त्यानंतर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर भात ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा.

आता या पेस्टमध्ये व्हिटामिन ई तेलाचे काही थेंब घाला. व्हिटामिन ई तेल अँटी-एजिंग गुणधर्मांसह समृद्ध आहे. ही पेस्ट व्यवस्थित मिसळा आणि ती एका डब्यात किंवा भांड्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता आंघोळ करुन शरीरावर लोशनऐवजी ही पेस्ट वापरा, काहीच दिवसांत याचा फरक तुम्हाला कळेल. त्याच्या दैनंदिन वापरामुळे आपल्या त्वचेवर एक वेगळीच चमक दिसायला लागेल आणि त्वचा मुलायम वाटेल.

तांदळाचे पाणीही लाभदायी!

केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात, जे केसांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरतात. आठवड्यातून दोनदा डोके धुल्यानंतर तांदळाचे पाणी वापरा, काही दिवसांत फरक दिसून येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Rice Face pack Korean beauty tips for healthy and glowing skin)

हेही वाचा :

Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे