काही क्षणांत घालवू शकता पर्मनंट टॅटू, कोणतीच खूण राहणार नाही
How To Remove Permanent Tattoo : कायमस्वरूपी काढलेला टॅटू हटवणे अशक्य असते असं म्हणतात. पण प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही ते कायमचे सुरक्षितपणे काढू शकत.
नवी दिल्ली : टॅटू (Tattoo ) हा नेहमीच फॅशनमध्ये असतो. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुणांना त्याची खूप आवड दिसते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा चांगला लूक मिळावा यासाठी लोक त्यांच्या आवडीचे टॅटू बनवतात. अनेक लोकांना त्यांच्या मानेवर, मनगटावर, पायांवर, हातावर टॅटू बनवायला आवडते, पण जसजसा वेळ जातो तसतसा काही लोकांना हा टॅटू नकोसा होत जातो आणि काहींना तो लवकरात लवकर (removal of Tattoo ) काढायची इच्छा असते.
अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. परंतु कायमस्वरूपी टॅटूचा काढणे अशक्य वाटते, पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढू शकता. ते कसे हे जाणून घेऊया.
लेझर टॅटू रिमूव्हल ( Laser Tattoo Removal)
लेझर टॅटू रिमूव्हल ही कायमस्वरूपी टॅटू काढण्याची सर्वात सामान्य आणि प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत त्वचेतील शाईचे कण तोडण्यासाठी उच्च-तीव्रतेच्या लेझर प्रकाशाचा वापर करून कार्य करते, जे नंतर शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे शोषले जातात आणि नैसर्गिकरित्या काढून टाकले जातात. यामुळे तुमच्या शरीराला अजिबात नुकसान होत नाही. त्याच वेळी, वेगवेगळ्या रंगांचे टॅटू काढण्यासाठी वेगवेगळ्या लेसरची आवश्यकता असते. टॅटू काढण्यासाठी रुग्णांना अनेक सत्रांमध्ये यावे लागते. लेझर टॅटू काढण्याशी संबंधित जोखीम कमी असतात, त्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे तात्पुरती लालसरपणा, सूज आणि फोड येणे हे आहेत. तथापि, हे दुष्परिणाम सामान्यतः सौम्य असतात आणि काही दिवसातच ते स्वतःच कमी होतात.
डर्माब्रेशन ( Dermabrasion)
डर्माब्रेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचा विशेषज्ञ हे टॅटूची शाई काढून टाकण्यासाठी त्वचेचा वरचा थर काढून टाकतो. हे ओरखडे त्वचेच्या आतील स्तरांवर जाते, ज्यामुळे टॅटूची शाई त्वचेतून बाहेर येते. ही पद्धत लेझर टॅटू काढण्याइतकी प्रभावी नाही आणि ती खूप वेदनादायक असू शकते. डाग पडणे, संसर्ग होणे आणि त्वचेच्या संरचनेत बदल होण्याचा धोकाही जास्त असतो.
सर्जिकल मेथड ( Surgical Removal)
शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी टॅटू काढले जाऊ शकतात. यासाठी भूल देऊन त्वचा सुन्न केली जाते. यानंतर सर्जिकल ब्लेडच्या मदतीने टॅटू काढला जातो. सर्जिकल टॅटू काढणे प्रभावी आहे. पण कधी कधी डाग पडतात. ही पद्धत सहसा लहान टॅटूसाठी राखीव असते आणि ती खूप प्रभावी असू शकते, परंतु ती सर्वात धोकादायक पद्धत देखील आहे. डाग पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि जखम बरी होण्याचा वेळ जास्त असू शकतो.
टॅटू कव्हर अप (Tatto Cover Up)
टॅटू कव्हर हा असाच एक पर्याय आहे जो लोक आजकाल अधिक निवडतात. जेव्हा तुम्हाला टॅटू पूर्णपणे काढायची इच्छा नसेल आणि त्याचे डिझाइन बदलायचे असेल तेव्हा हा पर्याय निवडता येतो. या तंत्रात, लहान टॅटू मोठ्या आकाराच्या डिझायनर टॅटूद्वारे लपवले जातात आणि त्याचे यश पूर्णपणे टॅटू कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)