Vastu Tips | वास्तु दोष आणि राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करेल ‘मीठ’, वाचा काय कराल?
मीठामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु दोष दूर करण्यातही प्रभावी ठरते. (Salt remove vastu dosh)
मुंबई : मीठामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु दोष दूर करण्यातही प्रभावी ठरते. सर्व ज्योतिषांच्या मते, मीठात आश्चर्यकारक शक्ती असते. मीठाला शुक्र व चंद्र यांचे प्रतिनिधी मानले जाते (Salt Can be helpful for remove vastu dosh and negativity from home).
स्वयंपाक घरातील मीठ आपल्या वास्तुतील राहु-केतुचे अशुभ परिणाम अगदी सहजपणे दूर करू शकते. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जा आणून, आनंद व समृद्धी देखील आणू शकते. चला तर, जाणून घेऊया असे काही मीठाचे उपाय, जे आपल्या घरात समृद्धी आणण्याचे काम करतील.
मीठाचा उपयोग :
– घरात वास्तु दोष असल्यास एका काचेच्या डबीत मीठ भरून टॉयलेट आणि वॉशरूममध्ये ठेवा. मीठ आणि काच दोन्ही राहूच्या गोष्टी मानली जातात. असे केल्याने राहु-केतुचे अशुभ प्रभाव संपुष्टात येतील आणि वास्तु दोषही संपतील.
– जर, अख्या मीठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगले गेले, तर नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. दुसरीकडे, जर ही पुरचुंडी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टांगली गेली असेल, तर पदोन्नतीचा मार्ग उघडेल आणि जर ती तिजोरीमध्ये लटकवली गेली, तर पैशाची कमतरता भासणार नाही.
– आठवड्यातून एकदा कुटुंबातील सर्व सदस्यांनी मीठाच्या पाण्याने आंघोळ करावी, यामुळे वाईट नजरेपासून तसेच, आरोग्याच्या समस्येपासून संरक्षण मिळते.
– पाण्यात मीठ घाला आणि गुरुवार वगळता आठवड्यातून प्रत्येक दिवशी घरातील फारशी पुसून घ्या. यामुळे सूक्ष्म जंतूंचा नाश होईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल. तसेच, राहु-केतुचे अशुभ परिणामही संपतील (Salt Can be helpful for remove vastu dosh and negativity from home).
– जर, घरात कुणाला नजर लागली असेल, तर मग एक चिमूटभर मीठ घ्या आणि त्यांच्यावर तीन वेळा फिरवून घ्या. मग, हे मीठ एकतर बाहेर फेकून द्या किंवा पाण्यात फेकून द्या. यामुळे नजर निघून जाईल.
– जर राहु आणि केतुची दशा चालू असेल, तर बर्याचदा मनात वाईट विचार उद्भवतात. अशावेळी, एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि एका कोपऱ्यात ठेवा. याचा मोठा परिणाम होईल
– झोपेच्या वेळी मीठाच्या पाण्याने पाय पूर्णपणे स्वच्छ केल्यास, तणाव दूर होतो आणि मन शांत होते.
लक्षात ठेवा!
मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये. याचा परिणाम चंद्र आणि शनि यांच्या एकत्रिकरणावर होतो, जो शुभ प्रभाव देत नाहीत. याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नये. यामुळे परस्पर संबंध खराब होतात, अशी मान्यता आहे.
(विशेष टीप: ‘टीव्ही 9 मराठी’ कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, प्रस्तुत लेखात ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.)
(Salt Can be helpful for remove vastu dosh and negativity from home)
हेही वाचा :
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मिळते शनि पीडेतून मुक्तता! वाचा या मागची पौराणिक कथा!
Jaya Ekadashi 2021 | पुण्यदायी ‘जया एकादशी’ व्रत, जाणून घ्या याची कथा आणि मुहूर्त#JayaEkadashi2021 | #JayaEkadashi | #devotional | #Poojahttps://t.co/ULlWKFAN0A
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021