Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Schooling: अशी एक आई जी, आपल्या मुलांना शाळेतच पाठवत नाही.. ‘या’ अनोख्या पद्धतीने शिकवते मुलांना संस्कारांसह नवनवीन गोष्टी!

अलीकडेच एका महिलेने सांगितले की, तिला 6 आणि 9 वर्षांची दोन मुले आहेत. पण तिने कधीही मुलांना शाळेत पाठवले नाही. महिलेने सांगितले की, आम्ही मुलांना घरी शिकवतो. आमची मुलं ‘होम स्कूलिंगमध्ये’ अनेक गोष्टी शिकतात. आम्ही मुलांना संग्रहालय आणि वाचनालयातही घेऊन जातो, असेही या महिलेने सांगितले.

Home Schooling: अशी एक आई जी, आपल्या मुलांना शाळेतच पाठवत नाही.. ‘या’ अनोख्या पद्धतीने शिकवते मुलांना संस्कारांसह नवनवीन गोष्टी!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 3:57 PM

आधुनिक काळात मूल जन्मल्यापासूनच आई-वडिलांना त्याच्या शालेय शिक्षणाची चिंता (Education concerns) सतावू लागते. यासोबतच आता मुलांना शाळेत प्रवेश घेणेही अवघड झाले आहे. मुलांच्या सर्वोत्तम शाळेत प्रवेशासाठी पालक लाखो रुपयांचे डोनेशन देवून प्रवेश मिळवतात. अशा परिस्थीतीत आज आम्ही तुम्हाला एका अशा आई बद्दल सांगणार आहोत, जिला, ना मुलांच्या प्रवेशाची चिंता आहे, नाहीच त्यांना शाळेत ने-आणची काळजी. नुकतीच या महिलेने तिची कहाणी सोशल मिडीयाद्वारे शेअर केली आहे आणि सांगितले आहे की, ती आपल्या मुलांना शाळेत न पाठवता कसे शिकवत आहे. महिलेने सांगितले की, सोशल मीडियावर मी अनेक पालकांना पाहते की ते त्यांच्या मुलांसाठी शाळेचा गणवेश आणि शालेय शिक्षणाला आवश्यक वस्तू (Essentials of education) खरेदी करतात. पालकांना दरवर्षी असे करताना पाहणे मला आवडते. पण मी स्वतः असे कधीच केले नाही. मला बसस्टॉपवरही मुलांना सोडावे लागत नाही आणि शेवटच्या क्षणी शाळेच्या प्रोजेक्ट्सचे टेन्शन (The tension of school projects) घ्यावं लागत नाही. कारण मी माझ्या मुलांना शाळेत पाठवले नाही. महिलेने सांगितले, मला दोन मुले आहेत एकाचे वय 9 वर्षे तर, दुसऱ्याचे 6 वर्षे आहे. दोन्ही मुले शाळेत जात नाहीत.

आपला उन्हाळा आरामात जातो

महिलेने सांगितले की, बाकी पालकांच्या तुलनेत आमचा उन्हाळा तणावमुक्त होतो. उन्हाळ्यात आम्ही आइस्क्रीम खातो, उद्यानात फिरायला जातो आणि लायब्ररीतही जातो. यासोबतच संपूर्ण महिन्याभराच्या नियोजना बाबतही तीने चर्चा केली. त्या नुसार, जर कोणाला भूगर्भशास्त्रात रस असेल तर आम्ही वसंत ऋतूमध्ये नैसर्गिक इतिहास संग्रहालयात जातो. आठवड्याच्या उर्वरित काळात सकाळी येथे लहान मुलांची फारशी गर्दी नसते. आम्ही उन्हाळ्यात कॅम्पिंगला जाऊ शकतो. त्या महिलेने सांगितले की, आम्हीही अनेक छोट्या-मोठ्या सहलीला जातो.

आम्ही मुलांना वर्षभर शिकवतो

महिलेने सांगितले की, होमस्कूलिंगमध्ये आम्ही आमच्या मुलांना दररोज आणि वर्षभर शिकवतो. आमचा असा विश्वास आहे की, मुले नेहमीच शिकतात. वसंत ऋतू दरम्यान आम्ही मुलांना शेतात काम करण्यासाठी देखील घेऊन जातो जेणेकरून त्यांना पिके कशी वाढवायची हे कळते. महिलेने सांगितले की, माझे 6 वर्षांचे मूल निसर्गाशी संबंधित गोष्टींनी प्रेरित होते, तर माझ्या 9 वर्षाच्या मुलाला व्हिडिओ गेम खेळायला आवडते. ज्यामध्ये खेळाडू शेती करतात, पिके घेतात आणि त्यांची विक्री करतात. महिलेने असेही सांगितले की, रात्रीच्या जेवणाच्या वेळी आपण अर्थशास्त्र, राजकारण आणि पर्यावरणावर देखील बोलतो.

होमस्कूलिंगची संकल्पना

या महिलेने सांगितले की, आम्हाला ‘होमस्कूलिंगची’ ही संकल्पना खूप आवडते. उन्हाळ्यात आमच्या सुट्ट्या खूप आरामात जातात. या दरम्यान आम्ही आराम करतो तर बाकीचे पालक आपल्या मुलांना तयार करून शाळेत पाठविण्याच्या घाईत असतात.

‘होमस्कूलिंगचे’ फायदे

-मुलांच्या शिक्षणावर पालकांचे नियंत्रण असते. -होमस्कूलिंगद्वारे पालक आणि मुलांमध्ये एक मजबूत बंध तयार होतो. -होमस्कूलिंगमध्ये ठराविक वेळेत अभ्यास करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलाला कधीही शिकवू शकता. -होमस्कूलिंगद्वारे पालक आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देतात. -यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांमध्ये दडलेल्या कलागुणांची माहिती मिळते. -होमस्कूलिंगमध्ये, पालक मुलांना त्या विषयांमध्ये अधिक मदत करू शकतात ज्यामध्ये ते खूप कमकुवत आहेत. -हे पालक आणि मुलांमध्ये चर्चा सुरू करण्यास देखील मदत करते जेथे पालक देखील मुलांकडून शिकू शकतात. -याद्वारे पालक मुलांना सांगू शकतील की, टेन्शन न घेता एन्जॉय करून अभ्यास करता येतो.

'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.