वीर्य वाया घालवणे पडू शकते भारी ! पिता होण्यासाठी ‘शुक्राणूं’ ची गुणवत्ताच आवश्यक; संशोधनातील माहिती

अलीकडेच, भारत आणि जर्मनीच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन संबधामधील अंतर पुरुषांच्या वंधत्व क्षमतेवर परिणाम करते.

वीर्य वाया घालवणे पडू शकते भारी ! पिता होण्यासाठी ‘शुक्राणूं’ ची गुणवत्ताच आवश्यक; संशोधनातील माहिती
Sperm cellImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 4:42 PM

प्रत्येक पुरुषाला एका ठरावीक वयानंतर कुटुंब आणि मुलं असावीत अशी इच्छा असते. पण कधी-कधी काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेक वेळा पुरुषांना अपत्य होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काळाच्या ओघात पुरुषांमध्ये मूल न होण्याची ही समस्या अधिकच वाढत आहे. हे लक्षात घेऊन भारत आणि जर्मनीतील प्रजनन तज्ज्ञांच्या पथकाने (A team of breeding experts) शुक्राणूंची गुणवत्ता आणि इजैक्‍युलेशन(स्खलन) यांच्यातील संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी वीर्यस्खलनाची लांबी (The length of ejaculation)आणि त्याचा शुक्राणूंवर होणारा परिणाम (Effect on sperm) यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ एंड्रोलॉजी आणि युरोपियन अकॅडमी ऑफ एंड्रोलॉजीचे अधिकृत जर्नल अँड्रॉलॉजीमध्ये 1 जुलै रोजी या अभ्यासाची नोंद करण्यात आली आहे.

2 ते 3 दिवसांचे अंतर ठेवा

असे मानले जाते की, दीर्घकाळ (इजैक्‍युलेशन)स्खलन होण्यापासून दूर राहिल्याने वीर्यामधील शुक्राणू पेशींची संख्या वाढते, परंतु प्रजनन तज्ञांनी गर्भधारणेसाठी प्रयत्नशील लोकांना दोन संबधां दरम्यान 2 ते 3 दिवसांचे आदर्श अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संभोगाच्या दरम्यान खूप कमी अंतर ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते.

गर्भधारणेसाठी प्रयत्नशील असाल तर

या अभ्यासासाठी, दोन वीर्यस्खलन आणि 10,000 पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेतील अंतराचे मूल्यांकन करण्यात आले. त्याच्या परिणामात असे आढळून आले की, जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर शुक्राणूंच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, सरासरी गुणवत्तेचे शुक्राणू असलेल्या पुरुषांनी दोन स्खलन दरम्यान दोन दिवसांचे अंतर ठेवावे. दुसरीकडे, ज्या लोकांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खूपच खराब आहे, त्यांनी ती सुधारण्यासाठी दोन स्खलन दरम्यान 6 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.

50 टक्के वंधत्वाचे कारण पुरुष

कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्लिनिकल भ्रूणविज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. सतीश अडिगा यांनी सेंटर ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड एंड्रोलॉजी, म्युएन्स्टर, जर्मनी यांच्या सहकार्याने मणिपालमधील या अभ्यासादरम्यान टीमचे नेतृत्व केले. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (डॉ.) वेंकटेश म्हणाले, “वंध्यत्व ही महिलांची समस्या म्हणून पाहिली जाते. परंतु भारतात असे आढळून आले आहे की, जवळजवळ 50 टक्के वंध्यत्वाचे कारण पुरुष घटक आहे.” बहुतेक प्रकरणांमध्ये हे, शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेमुळे होते. व्यंकटेश पुढे म्हणाले की आमचा नवीन अभ्यास अशा लोकांना मदत करेल जे वारंवार अपत्यप्राप्तीमध्ये अपयशी ठरतात.

हे आहेत संशोधनाचे निष्कर्ष

या संशोधनावर भाष्य करताना, डॉ. शरथ राव (डीन, केएमसी मणिपाल) म्हणाले की, पुरुषांमधील जननक्षमतेच्या समस्येवर अजूनही उघडपणे बोलले जात नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हेच कारण आहे की बऱ्याच वेळा ते शोधले जात नाही किंवा उपचार होत नाहीत. ते म्हणाले की, या संशोधनातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यातून पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येला कसे सामोरे जावे, हे कळेल.

अभ्यासाविषयी डॉ. अडिगा म्हणाले, “आमच्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, वीर्यस्खलनातील अंतर हे शुक्राणूंची प्रजनन क्षमता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यशस्वी गर्भधारणेसाठी वीर्यमधील शुक्राणूंची संख्या पुरेशी नसते. याचे कारण म्हणजे एकदाच वीर्य योनीमध्ये प्रवेश केल्यावर शुक्राणूंना अंड्याकडे पोहावे लागते. म्हणूनच गर्भधारणेसाठी शुक्राणूंची गतिशीलता, रचना आणि डीएनए गुणवत्तेसाठी आवश्यक आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.