Shrutika Mane | भारतीय नारी जगात भारी! ‘ठाण्याची लेक’ श्रुतिका माने ठरली ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडिया’ची विजेती

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी दरवर्षी ‘मिस इंडिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते.

Shrutika Mane |  भारतीय नारी जगात भारी! ‘ठाण्याची लेक’ श्रुतिका माने ठरली ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडिया’ची विजेती
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 12:59 PM

ठाणे : ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने हीने वयाच्या 20 वर्षी, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या ‘मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’त विजेतेपद पटकावले आहे. श्रुतिका माने हिचा जन्म इंग्लडला झाला होता. त्यानंतर पुन्हा भारतात परतल्यावर ठाण्यातील सिंघानिया स्कूलमधून तिने पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून ‘अॅडव्हान्स हेल्थ अँन्ड मेडिकल सायन्स’चे पदवी शिक्षण घेत आहे (Shrutika Mane a girl from thane wins Australia miss India beauty contest title).

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी दरवर्षी ‘मिस इंडिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ‘मिस इंडिया स्पर्धे’च्या अंतिम फेरीत निवड झालेल्या 7 स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी या सौंदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

श्रुतिकाने कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून, शालेय जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. याशिवाय तिला अभिनयाची देखील आवड आहे. 2001मध्ये सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय रहिवासी राज सुरी यांनी ‘मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’ला सुरूवात केली होती. ऑक्टोबर 2021मध्ये मुंबईत होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे (Shrutika Mane a girl from thane wins Australia miss India beauty contest title).

जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व!

आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, ‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’साठी माझी निवड झाली, ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे, ज्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय करता येईल, याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे, हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता’, असे श्रुतिकाने सांगितले.

डॉक्टर आई-वडिलांची प्रतिक्रिया

श्रुतिकाचे वडील डॉक्टर संदीप माने व आई डॉक्टर राजश्री माने हे दोघेही आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून, मुली देखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. सर्व पालकांनी आपल्या मुलींच्या कर्तृत्त्वाला साथ दिली पाहिजे.’

(Shrutika Mane a girl from thane wins Australia miss India beauty contest title)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.