दूध हळदीचं सेवन आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या दुष्परिणाम
हळीद आणि दूध हे देन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. आयुर्वेदानुसार, निरोगी शरीरासाठी तुम्ही हळदीचे सेवन करणे गरजेचे असते. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आणि अँटिबॅक्टिरियल गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दूधाचे सेवन देखील तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. अनेकांना हळद आणि दूधाचे सेवन केल्यामुळे त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया दुध हळद पिण्याचे तोटे.
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे तुमच्या जेवणाची चव वाढते. मसाल्यांमधली हळद तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर हळदीचे तुमच्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. तसेच अनेकांना दूध पिण्याची देखील सवय असते.
दूधामुळे देखील तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेकांना रात्री किंवा हिवाळ्यात दूध हळद पिण्याची सवय असते. माहितीनुसार, दूध आणि हळद प्यायल्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतात. दूध हळदीचे सेवन केल्यामुळे तुमचं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
तसेच गॅस आणि अॅसिडिटी यारख्या समस्यांवर दूध आणि हळद गुणकारी ठरते. हिवाळ्यात दुध आणि हळदीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला सर्दी आणि डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
हिवाळ्यामध्ये देखील दूध हळद पिण्याचे अनेक फायदे आहेत. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स, अँटिफंगल आणि अँटिबॅक्टिरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यासोबतच दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मिनरल्स असतात ज्यामुळे तुमचे आोग्य आणि हाडांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
हळद आणि दूधाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रकिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. दूध हळदीच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते ज्यामुळे तुमचे वजनन नियंत्रित राहाण्यास मदत होते . परंतु, अनेकांना दूध हळद प्यायल्यामुळे त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया दूध हळद प्यायल्यामुळे काय त्रास होऊ शकतो.
हळदीचे दुध पिण्याचे तोटे :
हळद तुमच्या शरीरासाठी उष्ण मानली जाते. गर्भधारणेदरम्याण दुध हळदीचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान दुध हळदीचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात दुध हळदीचे सेवन केल्यामुळे तुमच्याा यकृताचे आरोग्य कमकुवत होते. यकृताचे आरोग्य बिघडल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक गंभीर परिणाम होतात. जास्त प्रमाणात हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला मळमळ, अॅसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळदीच्या दुधाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. हळद आणि दुधाचे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळदीच्या दुधाचे सेवन घातक ठरते. जास्त प्रमाणात हळद दुधाचे सेवन केल्यामुळे अनेकवेळा नाकामधून रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
हळदीच्य दुधाचे फायदे :
झोपण्यापूर्वी हळद दुधाचे सेवन केल्यामुळे शांत झोप लागते.
रात्री हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहाते.
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दुध प्यायल्यामुळे सकाळी तुमचे पोट साफ होण्यास मदत होते.
तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करू शकता.