कोरोनाच्या भीतीने गरजेपेक्षा अधिक वेळा हात धुताय? होऊ शकते त्वचेचे नुकसान!

कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी, वारंवार हात स्वच्छ करणे आणि साबणाने हात धुणे ही अतिशय चांगली सवय आहे.

कोरोनाच्या भीतीने गरजेपेक्षा अधिक वेळा हात धुताय? होऊ शकते त्वचेचे नुकसान!
वारंवार हात धुण्यामुळे हातांची चमक कमी होते
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 2:44 PM

मुंबई : कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी, वारंवार हात स्वच्छ करणे आणि साबणाने हात धुणे ही अतिशय चांगली सवय आहे. सध्या देशात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मात्र, लस आली म्हणून निर्धास्त न होता, सर्व लोकांना वारंवार हात धुण्यास आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले आहे. जेव्हा जेव्हा आपण बाहेरून घरी येतो तेव्हा खाण्यापूर्वी आणि शौचालयातून आल्यावर हात धुण्याची सवय आपल्या सगळ्यांच आहे. ही एक चांगली सवय आहे जी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. परंतु कोरोनाच्या भीतीने बरेच लोक आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा हात धुतात. तथापि, वारंवार आपले हात धुण्याने आपल्या त्वचेवर परिणाम होतो (Side effects of excessive hand washing).

यूएस डिसीज कंट्रोल अँड डिप्रेशन केंद्राच्या म्हणण्यानुसार, निरोगी राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु, जास्त हात धुणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे. तज्ज्ञांच्या मते, आपल्या हातावर दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील एक बॅक्टेरिया आपल्याला आजारी पाडतात, तर दुसरे आपल्याला निरोगी ठेवतात. मात्र, वारंवार हात धुतल्याने त्वचेवर असणारे चांगले बॅक्टेरिया देखील काढून टाकले जातात.

सॅनिटायझरचा जास्त वापरदेखील हानिकारक

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वारंवार हात धुणे आणि हातावर सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने आरोग्यावरदेखील परिणाम होतो. या गोष्टींचा जास्त वापर केल्याने तुम्ही आजारी देखील पडू शकता.

याशिवाय वारंवार हात धुण्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल दूर होते. ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू लागते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा आणि त्वचा सालाप्रमाणे सोलली जाणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी, हात स्वच्छ धुल्यानंतर मॉइश्चरायझेशन करणे आवश्यक आहे (Side effects of excessive hand washing).

सॅनिटायझरचे दुष्परिणाम

हॅण्ड सॅनिटायझर तुम्हाला फायदेशीर ठरण्यापेक्षा हानीकारक अधिक ठरु शकते. एका नव्या रिसर्चमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम समोर आले आहे. या नव्या संशोधनानुसार, अलकोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करण्याने मुलांना अनेक आजार संभवतात. यात प्रमुख्याने पोटदुखी, मळमळणे आणि ओमेटिंगसारखे त्रास मुलांना होऊ शकतात. तसेच याच्या अतिरिक्त वापरामुळे मुले कोमात जाण्याचा धोका अधिक संभवतो, असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने (CDCP) यावर रिसर्च केले आहे. या संशोधनाअंती हॅण्ड सॅनिटायझरच्या संपर्कात मुलांना गंभीर आजार संभवतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

(Side effects of excessive hand washing)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.