Garlic | आरोग्याच्या ‘या’ समस्यांनी त्रस्त आहात? मग, लसणाचे सेवन करताना विचार करा!

माहिती अभावी लसणाच्या चुकीच्या वापरामुळे देखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Garlic | आरोग्याच्या ‘या’ समस्यांनी त्रस्त आहात? मग, लसणाचे सेवन करताना विचार करा!
लसूण
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 6:55 PM

मुंबई : आरोग्याच्या बाबतीत लसूणचे बरेच फायदे आहेत. लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते.  शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. परंतु, माहिती अभावी लसणाच्या चुकीच्या वापरामुळे देखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीराच्या काही व्याधींमध्ये लसणाचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते (Side effects of garlic).

रक्तदाबाची समस्या

जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते. वास्तविक, लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी उत्तम कार्य करतो, अशा परिस्थितीत जर कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी लसूण खाल्ले, तर त्यांच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

हिमोग्लोबिन कमी होते.

हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.

पुरळाची समस्या

लसणीमध्ये एलीनेज नावाचे एंजाइम असते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ देखील उठू शकते. यात असलेले एंजाइम द्रव्य यामुळे लसूण कापताना हातांमध्ये जळजळ जाणवते. जर तुम्हाला आधीच पुरळ उठण्याची समस्या असेल तर, लसूण मर्यादित प्रमाणात खा, नाही तर ही समस्या वाढू शकते.

डोकेदुखीची समस्या

काही लोक सकाळी रिक्त पोटी कच्चा लसूण खातात, त्याचे बरेच फायदे देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल, तर तुम्ही कच्चा लसूण खाऊ नये. कच्च्या स्वरूपातील लसणीचे सेवन डोकेदुखीसाठी ट्रिगर म्हणून काम करते (Side effects of garlic).

लसणाचे काही फायदे :

वयाच्या 40व्या वर्षानंतर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्यास सुरुवात होते. बर्‍याच लोकांची त्वचा या वयात सैल होऊ लागते. या सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, बऱ्याचदा त्याचा काही फायदा होत नाही. अशा लोकांसाठी लसूण खूप उपयुक्त आहे. यासाठी लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.

दररोज घराबाहेर फिरून काम करणाऱ्या लोकांना ब्लॅकहेड्सचा त्रास होतो. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा टोमॅटो बारीक पेस्ट बनवा आणि 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे ब्लॅकहेड्सच्या समस्येतून आराम मिळेल.

(Side effects of garlic)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.