20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची..? सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..!
Health Tips कोरोनाने पूर्ण जगात कहर केला आहे आणि आता ओमिक्रॉन हा वेरिएंटमुळे तर अजून थैमान घातला आहे. दोन डोस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता तर कोरोनाची लक्षणं रुग्णांमध्ये महिनाभर दिसून येत आहे. हो, बरोबर महिनाभर... याला मेडिकल भाषेत लॉन्ग कोविड असं म्हणतात.
नवीन वर्षाची सुरुवातीसोबत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनाही पुन्हा कोरोना झाला. अगदी कोरोनाशी लढण्यासाठी आपण लसीचे दोन डोज घेतले तरी कोरोनाची त्यांना लागण झाली. आता एका नवीन अभ्यासानुसार कोरोना बरा झाल्यावरील त्याची लक्षणं जवळपास एक महिना दिसत आहेत. असे लक्षण ज्यांमध्ये दिसून आली आहेत त्यांना लॉन्ग कोविड झाला असं म्हणतात आहे. त्यात ओमिक्रोनमुळेही डॉक्टरांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. ओमिक्रोन वेरिएंटमुळे अनेकांना लॉन्ग कोविड झाल्याचं दिसून येत आहे.
लॉन्ग कोविड म्हणजे काय?
जेव्हा कोरोना रुग्णाला 14 दिवसानंतरही लक्षणं दिसून येत आहेत. म्हणजे अगदी 4 आठवड्यानंतरही कोरोनाची लक्षणं दिसतात अशा रुग्णांना लॉन्ग कोविड झालं असं म्हणतात. विशेष म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांना पण काही दिवसांना कोरोनाची गंभीर लक्षणं दिसून आली आहेत.
यांना आहे लॉन्ग कोविडची भीती
लॉन्ग कोविड वृद्धांना होण्याची दाट शक्यता असते. आणि ज्यांना पहिलेपासून काही दीर्घ आणि गंभीर आजार आहेत अशाना लॉन्ग कोविड होऊ शकतो. खरं तर स्वस्थ आणि तरुणांनाही लॉग्न कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लॉन्ग कोविडची लक्षणं
1. थकवा 2. सतत खोकला येणे 3. श्वास घेण्यास त्रास होणे 4. ब्रेन फोग 5. चिंता
महिनाभर असणाऱ्या कोविडची लक्षणं
वास न येणे आणि चव जाणे ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोना रुग्णांना श्वासात संक्रमण झाल्यामुळे आपल्याला वास येत नाही आणि चव जाणवतं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही रुग्णांची ही लक्षण लवकर बरी होतात पण काहीना ही दीर्घ काळ असतात. या स्थितीला मेडिकल भाषेत पारोस्मिया असं म्हणतात. या व्यक्तीला गंधाची विकृत भावना असते. या आजारात रुग्णांना कचऱ्याचा वास, पेट्रोल यासारखा वास यायला लागतो. एका सर्वेक्षणानुसार 49.3 टक्के रुग्ण हे पारोस्मियाचा जवळपास तीन महिने सामना करतात. तर जवळपास 50.7 टक्के रुग्णांना तीन महिन्यांचा वरती हा त्रास सहन करावा लागतो.
याशिवाय कुठली लक्षणं दिसतात?
1. सतत खोकला येणे 2. सांधे दुखी 3. कंजेक्शन 4. डोके दुखी 5. ब्रेन फोग 6. झोपेचा त्रास 7. थकवा 8. श्वसनाचा त्रास 9. श्वास लागणे 10. सुस्त वाटणे 11. काहींना केस गळण्याचा त्रास होतो.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा