Relationship Tips : या 5 सवयीची प्रचंड चीड, बदलल्या पाहिजेत? बायको की नवऱ्याने?
नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास हा गाभा असतो. पण काही वर्तनामुळे हा विश्वास ढासळू शकतो. जसे की, सतत वाद, फोनवर रमणे, प्रश्न न विचारणे, संदेशांना दुर्लक्ष करणे, वेळ टाळणे आणि गोष्टी शेअर न करणे. हे लक्षणे तुमच्या नात्यातील घटणारी प्रेमाची सूचना देऊ शकतात. समस्या ओळखून त्यावर ताबडतोब उपाय करणे आवश्यक आहे. सामंजस्य आणि संवाद यांच्याद्वारे नात्याला वाचवता येते.
नवरा बायकोतील संबंध विश्वासावर आधारीत असतं. विश्वासाच्या नाजूक धाग्यावर त्यांच्या प्रेमाचा अंकूर फुलत असतो. पण नात्यात थोडासा जरी तणाव आला तर हा धागा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नवरा बायकोने प्रत्येक गोष्ट सामंजस्याने घेतली पाहिजे. एक व्यक्ती रागावला असेल तर दुसऱ्याने बॅकफूटवर राहिलं पाहिजे. सबुरीने सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे. जीवनसाथीचा राग शांत झाल्यावर, वातावरण निवळल्यावर वस्तुस्तिथी सांगितली पाहिजे.
पण वस्तुस्तिथी सांगताना बोलण्याचा टोन रागाचा किंवा भांडणाचा नसावा. पण हे अनेकांना जमतंच असं नाही. अनेकदा बायको आपल्या नवऱ्याच्या वागण्यावरून हे जाणवते की ते त्यांच्यातील इंटरेस्ट हरवत आहेत, आणि हे नातं केवळ मुलं, कुटुंब आणि समाजासाठी पुढे चालू ठेवले जात आहे. जर तुमच्यासोबत देखील काहीतरी असं घडत असेल, तर हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी एक मोठा इशारा आहे. त्यामुळे नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
बोलताना सतत वाद घालणे
तुम्ही प्रत्येक गोष्टीवर वाद घालू लागलात आणि ही तुमची कायमची सवय बनली, तर हे तुमच्या नात्याला नुकसान पोहोचवू शकते. कारण तुमच्या या वागण्यामुळे एकवेळ अशी येते की तुमचा नवरा तुमच्याशी वाद घालणे थांबवतो. परिणामी, त्याचा तुमच्यातील इंटरेस्ट कमी होतो.
सतत फोनवर असणे
नवरा घरी आल्यावरही तो सतत फोनवर असेल किंवा तुम्हाला काही कामाचा बहाणा देऊन कटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुमच्यात काही इंटरेस्ट नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याला तुमच्याशी फार नातं टिकवून ठेवायचं नाही, असा त्याचा अर्थ निघतो.
कोणताही प्रश्न न विचारणे
नवरा बायकोने एकमेकांना प्रश्न विचारणे सामान्य आहे. पण तुम्ही उठसूट प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारायला लागल्यावर नवरा इरिटेड होतो. तो तुमच्याशी बोलायचंच बंद करतो. त्याचं हे वागणं तुमच्याशी असलेल्या संबंधांबद्दल अनुत्साही असण्याचं संकेत आहे.
फोन किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करणं
पूर्वी, तुमचा पती तुमचे कॉल आणि संदेश लगेच पाहून उत्तर द्यायचा. पण आता बराचवेळ तुमच्या मेसेजला उत्तर देत नसेल किंवा तुमचा फोन घेत नसेल तर त्याची तुमच्यातील रुची कमी झाली आहे, असा त्याचा अर्थ होतो.
वेळ टाळणे
तुमचा नवरा तुमच्यासोबत अधिक वेळ घालवणे टाळत असतो. त्याला तुमच्यासोबत वेळ घालवणं कंटाळवाणं वाटू लागतं. तुमचं नातं संपुष्टात येत असल्याचे हे संकेत आहेत.
सर्व गोष्टी शेअर न करणे
पहिल्यांदा, तो तुमच्याशी त्याच्या दिवसाची सर्व माहिती शेअर करत असे. पण आता हळूहळू, तो स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवू लागला आहे आणि त्याच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं टाळतो. यामुळे तुमच्या नात्यात तणाव वाढतो आणि ते खराब होण्यास वेळ लागत नाही.