Skin Care : शांत झोप हवी असेल तर ‘या’ पदार्थाने रोज पायाच्या तळव्यांना करा मसाज
तूप हे चविष्ट तर असतंच पण आरोग्यासाठीही परिपूर्ण आहे. अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. पायाच्या तळव्यांनाही तुपाने मसाज करू शकतो.
Skin Care : खाशील तूप (Ghee) तर येईल रूप…. ही म्हण सर्वांनाच माहीत असेल. भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर सर्रास केला जातो. भाजी , आमटीला फोडणी देण्यापासून ते गरमागरम पोळी, भातावर घालून खाल्ल्यावरही तूप मस्त लागतं. याशिवाय बरेच लोक डोक्याच्या मसाजसाठी तुपाचा वापर करतात. तुपाने पायाच्या तळव्यांनाही मसाज (benefits of ghee) करू शकता.
तूप आरोग्यासाठी अनेक फायदे देते. तणाव दूर करण्यासोबतच आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया रोज कोमट तुपाने तळव्यांना मसाज केल्याने कोणते फायदे होतात.
फाटलेल्या टाचा
कोमट तुपाने तळव्यांना मसाज केल्याने टाचांच्या भेगांपासूनही आराम मिळतो. यामुळे त्वचा हायड्रेट होते. तसेच त्वचा मुलायमही होते. पायाच्या तळव्यावर तूप लावल्याने टाचांच्या भेगा दुरुस्त होण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते
भेगा पडलेल्या टाचांवर तूप लावल्याने तणाव कमी होतो. यामुळे तुम्हाला आराम मिळतो. तळव्यांना तुपाने मसाज केल्याने तुमचा ताण कमी होतो. तळव्यांना मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे तुम्हाला खूप चांगली झोप लागते. तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
ब्लोटिंगचा त्रास होतो दूर
पायाच्या तळव्यांना तुपाची मालिश केल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो. त्यामुळे सूज येण्याच्या समस्येत आराम मिळतो. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.
सांधे दुखी
तळव्यांना तुपाने नीट मसाज केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही पायाच्या तळव्यावर तूप लावून मसाज करू शकता. त्यामुळे हाडेही मजबूत होतात.
घोरण्याची समस्या होते दूर
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील हा एक चांगला उपाय आहे. घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांची मालिश करू शकता. घोरण्यापासून आराम मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.