Skin Care | चेहऱ्यावरील डाग-मुरूमांच्या समस्येवर गुणकारी ‘ग्रीन टी’ फेस पॅक! 

| Updated on: Jan 05, 2021 | 1:27 PM

आरोग्याच्या बाबतीत ‘ग्रीन टी’च्या अनेक फायद्यांविषयी आपण ऐकले आहेच. विशेषत: वजन कमी करण्यासाठी ‘ग्रीन टी’ खूप फायदेशीर आहे.

Skin Care | चेहऱ्यावरील डाग-मुरूमांच्या समस्येवर गुणकारी ‘ग्रीन टी’ फेस पॅक! 
फेसपॅक
Follow us on

मुंबई : आरोग्याच्या बाबतीत ‘ग्रीन टी’च्या अनेक फायद्यांविषयी आपण ऐकले आहेच. विशेषत: वजन कमी करण्यासाठी ‘ग्रीन टी’ खूप फायदेशीर आहे. परंतु, आरोग्याप्रमाणेच ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. ग्रीन टीपासून तयार केलेले फेस पॅक आपल्या चेहर्‍याचा टोन सुधारू शकतात. याशिवाय ग्रीन टीयुक्त फेस पॅकमुळे आपल्याला चेहऱ्याच्या सर्व समस्यांमधून मुक्ती मिळू शकते. चेहऱ्याच्या वेगवेगळ्या समस्येसाठी वेगवेगळ्याप्रकारचे ग्रीन टी फेस पॅक तयार करता येतात. जाणून घेऊया या वेगवेगळ्या फेस पॅकबद्दल…(Skin care routine green tea face pack)

तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी फेस पॅक

जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ग्रीन टी आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर किमान 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मुरुम आणि डागांच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच, त्वचा चमकदार होईल.

ग्रीन टी-मध फेस पॅक

कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक सर्वोत्तम ठरेल. हा फेस पॅक तयार करण्यासाठी तीन चमचे ग्रीन टीमध्ये दोन चमचे मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचा खूप मऊ आणि चमकदार दिसेल. आपण दररोज हा पॅक वापरू शकत नसाल, तर आठवड्यातून किमान दोनवेळा याचा वापर केल्याने जलद परिणाम दिसून येतील (Skin care routine green tea face pack).

ग्रीन टी-पुदीना फेस पॅक

ग्रीन टी-पुदीना फेस पॅक उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याला प्रचंड आराम देतो. पुदीन्यामुळे, चेहऱ्याला थंडावा आणि ताजेपणा येतो, तर त्वचा देखील घट्ट होते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी, 2 चमचे पुदीन्याच्या पानांचा रस, 1 चमचा मध आणि 3 चमचे ग्रीन टीची पाने बारीक वाटून घ्या. ही पेस्ट चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून किमान 20 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तरी हा फेस पॅक वापरावा.

हळद-ग्रीन टी फेस पॅक

पुळ्या, मुरुमांची समस्या आणि चेहऱ्यावरील डागांपासून मुक्त होण्यासाठी ग्रीन टी-हळद फेस पॅक फायदेशीर ठरतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी 1 चमचे ग्रीन टीमध्ये, पाव चमचा हळद आणि एक चमचा बेसन पीठ घालून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 20 मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावा ठेवा, नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे मुरुमांचा त्रास बर्‍यापैकी कमी होईल.

ग्रीन टी-मुलतानी माती फेस पॅक

तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Skin care routine green tea face pack)

हेही वाचा :