Potato Peel | बटाट्याचे साल फेकून देताय? थांबा, त्वचेची निगा राखण्यात येईल कामी!

आपले सौंदर्य उजळवण्यासाठी देखील बटाट्याची साल उपयुक्त आहे. डोळ्यांखालील काळ्या डागापासून ते केसांना नैसर्गिक रंग देण्यापर्यंत बटाट्याच्या सालीचा वापर होते.

Potato Peel | बटाट्याचे साल फेकून देताय? थांबा, त्वचेची निगा राखण्यात येईल कामी!
बटाट्याची साल
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 4:36 PM

मुंबई : बटाटा ही अशी भाजी आहे की जिचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. मात्र, भाजीत बटाटा घालताना आपण त्याची साल काढून टाकतो. कचरा समजून फेकून दिल्या जाणाऱ्या बटाट्याच्या सालीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आपण नुसत्याच या साली फेकून देत नाही, तर त्यातील पोषक तत्व देखील फेकून देतो. बटाट्याची साल ही फक्त त्यातील पोषक तत्वासाठीच ओळखली जात नाही, तर वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी असल्याचे म्हटले जाते (Skin care tips benefits of potato skin).

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. त्यामुळे अनेक आजार दूर राहण्यासाठी बटाट्याची साल फायदेशीर ठरते. आपले सौंदर्य उजळवण्यासाठी देखील बटाट्याची साल उपयुक्त आहे. डोळ्यांखालील काळ्या डागापासून ते केसांना नैसर्गिक रंग देण्यापर्यंत बटाट्याच्या सालीचा वापर होते. चला तर, जाणून घेऊया या सालींच्या अनेक फायद्यांविषयी…

डार्क सर्कल्स

कधीकधी डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. या समस्येवर मात करण्यासाठी आपण डोळ्याखाली बटाट्याची साल वापरू शकता. बटाटाची साल बारीक करून त्याचा रस काढा आणि कापसाच्या सहाय्याने डार्क सर्कल्सवर लावा. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा रस त्वचेवर लावू शकता (Skin care tips benefits of potato skin).

केसांना नैसर्गिक रंग

जर आपले केस पांढरे असतील आणि केसांना रंग करायचा असेल, तर आपण बटाट्याचे साल वापरू शकता. बटाट्याच्या सालाची एक वाटी अर्धा लिटर पाण्यात उकळा आणि जेव्हा हे पाणी आटून केवळ, चार ते पाच चमचे शिल्लक राहील तेव्हा आच बंद करून, थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांवर लावा. काही वेळाने केस स्वच्छ धुवा.

नितळ व सुंदर त्वचा

नितळ व सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सर्व प्रथम एक छोटा कच्चा बटाटा घ्या आणि स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. यानंतर बटाटा किसून घ्या. बटाटा किसताना त्याचा रस देखील निघेल, तो फेकू नका. बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि बाजूला ठेवून द्या. आता आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर किसलेला बटाटा आपल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याचा १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. चेहऱ्यासह तुम्ही आपल्या मानेवरही बटाटा लावू शकता.

बटाट्याची साल आपल्या त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंटच्या स्वरुपातही कार्य करते. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin care tips benefits of potato skin)

हेही वाचा :

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.