Skin Care | ‘ब्लाइंड पिंपल्स’च्या समस्येने हैराण? ‘या’ उपायांनी मिळेल आराम…

आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल आपल्या त्वचेवरही परिणाम करतात, हे आपल्या लक्षातच येत नाही.

Skin Care | 'ब्लाइंड पिंपल्स'च्या समस्येने हैराण? 'या' उपायांनी मिळेल आराम...
अशा मुरुमांना नेहमीच दाबणे किंवा फोडणे टाळा.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 12:18 PM

मुंबई : लोक आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. परंतु, आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात, हे आपण लक्षात घेतच नाही. यामुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूमं येतात. त्यातही ‘ब्लाइंड पिंपल्स’ सर्वात त्रासदायक असतात (Skin Care tips for blind pimple).

हे एक अशा प्रकारचे मुरुम आहे, जे त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली असते. त्यामुळे ते चेहऱ्यावर मुळीच दिसत नाहीत, म्हणूनच त्यांना ‘ब्लाइंड पिंपल्स’ म्हणतात. मात्र, या समस्येपासून मुक्त होणे खूप अवघड आहे. परंतु, काही उपाययोजना केल्यास आपण शक्य तितक्या लवकर या समस्येतून मुक्त होऊ शकता. आपणही अशा समस्येने त्रस्त असाल तर, आम्ही आपल्याला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याने आपल्याला आराम मिळेल.

‘ब्लाइंड पिंपल्स’ कसे येतात?

ब्लाइंड पिंपल्स सेबम, बॅक्टेरिया आणि घाण आपल्या रोम छिद्रांमध्ये एकत्र अडकतात, ज्यामुळे आपल्या त्वचेखालील छोटी गाठ तयार होते. ही छोटीशी गाठ खूप दुखते. हे सामान्य मुरुमांसारखे दिसत नाही, परंतु जेव्हा आपण त्यांना स्पर्श करता तेव्हा ते खूप दुखवते.

मुरूमं दाबणे आणि फोडणे टाळा.

अशा मुरुमांना नेहमीच दाबणे किंवा फोडणे टाळा. त्यांना कधीही फोडण्याचा प्रयत्न करू नका. ते त्वचेच्या पृष्ठभागावर दिसत नसले तरी, नाहीत, त्यांना हात लावणे देखील धोकादायक असू शकते.

गरम शेक द्या.

या मुरुमांच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी, त्यांना गरम शेक द्या. यामुळे वेदना कमी होतात. तसेच ही पद्धत मुरूमं येण्यास प्रतिबंधित करते. दिवसातून तीन किंवा चार वेळा आपण या उपायाचा वापर करू शकता. हे मुरुमांची समस्या बरे करण्यास, तसेच मुरुम काढून टाकण्यास मदत करते (Skin Care tips for blind pimple).

पिंपल स्टिकर वापरा.

या मुरुमांच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आपण पिंपल स्टिकर देखील वापरू शकता. हे एखाद्या चिकटपट्टी प्रमाणे दिसते, जे आपण अशा मुरुमांवर लावू शकता.

अँटीबायोटिक वापरा.

अँटीबायोटिक्स कोणत्याही प्रकारच्या जीवाणूपासून मुक्त होण्यास मदत करतात. ते अशा मुरुमांमध्ये येणारी सूज देखील कमी करतात. क्लिंडामाइसिन आणि एरिथ्रोमाइसिन हे अँटीबायोटिक्स अशा मुरुमांसाठी वापरले जातात. दिवसातून दोन वेळा अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला जातो.

कच्चा मध लावा.

हा एक नैसर्गिक पर्याय आहे. यामध्ये बॅक्टेरिया नष्ट आणि प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म आहेत. ‘ब्लाइंड पिंपल्स’वर रात्रभर थोडा शुद्ध मध लावा. तसेच तो पाण्यात मिसळून आपण क्लीन्झर म्हणून देखील वापर करू शकता. जर आपल्याला या उपायांनी आराम मिळाला नाही, तर त्वरीत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(Skin Care tips for blind pimple)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.