Skin Care | चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येने त्रस्त? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

हिवाळ्याच्या काळात थंड वाऱ्यांमुळे आपली त्वचा कोरडी व निर्जीव दिसू लागते. याकाळात आपल्या त्वचेचे खूप नुकसान देखील होते.

Skin Care | चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येने त्रस्त? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
सुरकुत्या
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 5:58 PM

मुंबई : हिवाळ्याच्या काळात थंड वाऱ्यांमुळे आपली त्वचा कोरडी व निर्जीव दिसू लागते. याकाळात आपल्या त्वचेचे खूप नुकसान देखील होते. अशावेळी चेहऱ्यावरील आणि हातांची त्वचा कोरडी झाल्यामुळे त्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या हंगामात, त्वचेला पुन्हा पुन्हा मॉइस्चराइझ करणे आवश्यक खूप आवश्यक आहे (Skin Care Tips For getting rid of wrinkles).

हिवाळ्यात, थंड वाऱ्याच्या माऱ्यामुळे हातांच्या त्वचेवर सुरकुत्यादेखील दिसतात. यामुळे त्वचा कोरडी पडून फुटू लागते. अशावेळी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत, ज्याचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यासह हातांच्या सुरकुत्या सुधारण्यासाठी करून, त्वचेची काळजी घेऊ शकता.

टोमॅटो

टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यात इतर अनेक पौष्टिक घटक देखील असतात, जे त्वचेला सतेज करण्यास मदत करतात. टोमॅटोचा दररोज वापर करून आपण त्वचेवरील सुरकुत्या कमी करू शकता. यासाठी आपण टोमॅटो कुस्करून त्याचा गर किंवा टोमॅटोचा रस सुरकुत्यांवर लावू शकता.

ऑलिव ऑईल

ऑलिव ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज झोपायच्या आधी आपल्या हातांना देखील ऑलिव्ह ऑईलने मालिश करा. तेल लावून झाल्यावर हातात सूती ग्लोव्ह्ज घाला आणि रात्रभर छान झोप घ्या. सकाळी उठून कोमट पाण्याने आपले हात आणि चेहरा धुवा (Skin Care Tips For getting rid of wrinkles).

लिंबू आणि ब्राऊन शुगर

लिंबामध्ये व्हिटामिन सी प्रमाणात अधिक असते. व्हिटामिन सी युक्त अन्न खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. जेव्हा चेहऱ्यावर किंवा हातांवर सुरकुत्या दिसू लागतील तेव्हा आपण लिंबू आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब वापरू शकता. यासाठी एका भांड्यात एका लिंबाचा रस घ्या आणि त्यात अर्धा चमचा ब्राऊन शुगर टाकून त्याचा स्क्रब बनवा. हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा.

तांदळाचे पीठ

तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Tips For getting rid of wrinkles)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.