Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!
स्ट्रॉबेरी केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत स्ट्रॉबेरी खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात बऱ्याच प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट आहेत, जे चेहऱ्यावरील मुरुमं, काळे डाग या समस्येपासून आराम देण्यास मदत करतात (Skin care tips Strawberry face pack for dry skin).
स्ट्रॉबेरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात. व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध स्ट्रॉबेरीच्या सेवनामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी त्वचेवर नैसर्गिक एक्सफोलीएटप्रमाणे कार्य करते. चला तर, घरच्या घरी स्ट्रॉबेरी फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया…
स्ट्रॉबेरी फेस पॅक
साहित्य :
2 चमचे स्ट्रॉबेरी प्युरी
1 चमचा मध
1 चमचा ताजी मलई
कृती :
– एका भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र घेऊन, व्यवस्थित मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा.
– आपल्या चेहऱ्यावर थोडी वाफ घ्या आणि नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
– हा फेस मास्क चेहऱ्यावर पूर्णपणे कोरडा होऊ द्या.
– फेस मास्क व्यवस्थित वाळल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
– हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा हा फेस मास्क वापरावा (Skin care tips Strawberry face pack for dry skin).
एक्सफोलिएटर फेस मास्क
हिवाळ्यात थंड वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी होते आणि चेहऱ्याचे सौंदर्य हरवते. आपण हा फेस मास्क त्वचेचा गेलेला चमकदारपणा परत आणण्यासाठी वापरू शकता.
साहित्य
2 चमचे स्ट्रॉबेरी प्युरी
2 चमचे दही
1 चमचा तांदळाचे पीठ
1 व्हिटामिन ई कॅप्सूल
कृती :
– एका भांड्यांत वरील सर्व गोष्टींचे मिश्रण तयार करा. यानंतर व्हिटामिन ई कॅप्सूलमधून तेल काढून, ते या मिश्रणात घाला.
– हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
– 10 ते 15 मिनिटांनंतर जेव्हा पॅक व्यवस्थित कोरडे होईल, तेव्हा हात ओले करून चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल.
– त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी सौंदर्यतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Skin care tips Strawberry face pack for dry skin)
हेही वाचा :
हिवाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची आहे?, मग ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्याhttps://t.co/wrxK6zWdjd#beauty #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020