Skin Care Tips: त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी ‘फेसवॉश’ चा वापर योग्य पद्धतीने करा; जाणून घ्या, फेसवॉश वापरण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत!
पावसाळ्यात चेहऱा अतिप्रमाणात ऑईली दिसायला लागते. या दिवसात त्वचेवरील तेल अतिरीक्त प्रमाणात बाहेर पडत असल्याने, पुन्हा पुन्हा चेहऱा धुण्यास प्राधान्य दिले जाते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण वापरत असलेल्या फेशवॉश वापराची योग्य पद्धतही माहिती असणे गरजेचे आहे.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम आहे, कारण ते प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या गरजा (Skin needs) लक्षात घेऊन तयार केले जातो. फेसवॉश साबणाला एक उत्तम पर्याय देखील आहे. परंतू, फेशवॉशचा वापर प्रत्येक चेहऱ्याच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार करावा लागतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी पहिली गरज असते ती स्वच्छ पाणी आणि तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजेसा फेसवॉश. पावसाळ्यात त्वचेवरील अतिरीक्त ऑईल स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश अत्यंत आवश्यक (Facewash is essential) आहे. पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा थंड वारा असो, तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशचा वापर केव्हाही करू शकता. फेस वॉशमुळे त्वचेची छिद्रे देखील स्वच्छ होतात, अशा प्रकारे तुम्ही मुरुम, फ्रिकल्स, ब्लॅक हेड्स (Pimples, freckles, blackheads) इत्यादी सर्व समस्यांपासून वाचता. पण फेस वॉशचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत असायला हवे, अन्यथा ते लावून काही फायदा होणार नाही. येथे जाणून घ्या फेसवॉश वापरण्याची योग्य पद्धत.
फेसवॉश कधी वापरायचे
फेसवॉश दिवसातून किमान दोनदा सकाळ आणि संध्याकाळी वापरावा. जास्त वापर करू नका अन्यथा त्वचेवर कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते. ते वापरण्यापूर्वी, आपण प्रथम क्लिंजिंग दुधाने त्वचा स्वच्छ करावी. जर तुम्ही मेकअप केला असेल तर आधी मेकअप रिमूव्हरने मेकअप काढा. यानंतर क्लींजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर फेसवॉशने त्वचा स्वच्छ करावी.
स्टेप बाय स्टेप फेसवॉश वापरा
फेस वॉश वापरण्यापूर्वी, लोक अनेकदा चूक करतात की ते त्यांचे हात व्यवस्थित धुत नाहीत. प्रथम आपले हात साबणाने किंवा लिक्विड जेलने चांगले धुवा. जेणेकरून हातांची घाण चेहऱ्यावर येणार नाही. त्यानंतर चेहऱ्यावर फेसवॉश वापरा.
कीती वापरावा
चेहरा स्वच्छ करण्यासाठी फक्त 3-4 थेंब फेसवॉश पुरेसे आहेत. यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही. चेहऱ्यावर फेसवॉश लावल्यानंतर चेहऱ्याला किमान एक ते दोन मिनिटे मसाज करा. चेहऱ्यासोबतच मान आणि कानही स्वच्छ करावेत. त्यानंतर चेहरा धुवा. शक्य असल्यास चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
चेहरा घासू नका
चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने कोरडा पुसून घ्या. घासण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुमच्या त्वचेवरील छिद्र मोठे होऊ शकतात. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरा.