Health Tips | रात्री उपाशी पोटी झोपल्याने खरंच वजन कमी होते? जाणून घ्या या मागचे सत्य…
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नवनवीन मार्ग वापरात असतात. कुणी हेवी डाएटिंग करत, तर कुणी तासनतास जिममध्ये घाम गळतात. त्याच वेळी, असेही बरेच लोक आहेत, जे रात्री न जेवताच झोपी जातात.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नवनवीन मार्ग वापरात असतात. कुणी हेवी डाएटिंग करत, तर कुणी तासनतास जिममध्ये घाम गळतात. त्याच वेळी, असेही बरेच लोक आहेत, जे रात्री न जेवताच झोपी जातात. कारण, त्यांना वाटते की यामुळे ते लवकरच बारीक होतील. लंच आणि ब्रेकफास्ट प्रमाणेच रात्रीचे जेवण एक महत्त्वपूर्ण डाएट आहे (Skipping dinner for weight loss can harm your body).
रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ आपल्याला बर्याचदा अस्वस्थ करतात आणि आपल्या झोपेत अडथळा आणू शकतात. यामुळे जठरासंबंधी समस्या देखील वाढवू शकतात. रात्रीचे जेवण कसे असावे आणि त्यात कोणत्या गोष्टी खाव्यात किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत, याचा आपण विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.
रात्रीचे जेवण वगळावे का?
न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्राने यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘वजन कमी करण्यासाठी मुख्य आहार सोडू नका. असे आढळले आहे की बरेच लोक मुख्य आहाराऐवजी नाश्ता किंवा सलाडमध्ये बदल करतात किंवा काही लोक रात्री अजिबात खात नाहीत. हे कॅलरी कमी करण्यात मदत करते, परंतु त्याच वेळी, बर्याच दिवसानंतर याचा परिणाम जाणवू लागतो आणि तुमची उर्जा कमी होऊ लागते. ही प्रक्रिया आपल्या भूक हार्मोन्सचा सामना करण्यास मदत करेल. म्हणूनच, रात्री न जेवण्याऐवजी कमी आणि हलका आहार घ्यावा.’
रात्रीच्या जेवणाची उत्तम वेळ कोणती?
आहार तज्ज्ञांच्या मते, आपण झोपण्याच्या वेळच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण घेतले पाहिजे. रात्रीचे जेवण आणि झोपेच्या दरम्यान आपण पुरेसे अंतर राखले पाहिजे, हे खूप महत्वाचे आहे. जर आपण नियमितपणे त्याचे अनुसरण केले तर आपल्याला कधीही आपला रात्रीचे जेवण वगळण्याची आवश्यकता नाही (Skipping dinner for weight loss can harm your body).
रात्रीच्या जेवणात आपण काय खावे?
– रात्रीच्या जेवणासाठी खिचडी हा एक चांगला पर्याय आहे. हे आहारात हलके आणि फायबरने भरलेले आहे, जे आपल्याला बर्याच काळासाठी उत्साही ठेवू शकते.
– चपातीसह चिकन टिक्का किंवा डाळ-भात देखील एक चांगला पर्याय आहे. हे खाल्ल्यानंतर तुमचे पोट बर्याच काळासाठी भरलेले राहील व रात्री काही अनहेल्दी खाण्याची इच्छा होणार नाही.
– संध्याकाळी 7 नंतर मीठ कमी खावे. मीठ जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, जे वजन वाढवण्याचे काम करते.
रात्रीचे जेवण टाळण्याचे दुष्परिणाम :
– झोपेचा अभाव
– शरीरात जीवनसत्त्वे आणि पौष्टिक घटकांचा अभाव
– शरीराचे चयापचय कमी होऊ शकते
– भुकेलेल्या पोटी तुम्ही दुसऱ्या दिवशी जास्त अन्न खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते.
– दिवसाभराच्या थकव्यानंतर, आपल्या शरीराला रात्री विश्रांती घेण्याची संधी मिळते. म्हणूनच, रात्री त्याला उपाशी ठेवून, आपण त्याला ऊर्जा मिळविण्यापासून प्रतिबंधित करता. यामुळे शरीरात ऊर्जेचा अभाव निर्माण होतो.
– रात्रीचे जेवण कधीही वगळू नये. याऐवजी आपण एखादा निरोगी पर्याय निवडला पाहिजे. जर आपल्याला खूप भूक नसेल, तर आपण काहीही हलका पदार्थ खाऊ शकता.
(Skipping dinner for weight loss can harm your body)
हेही वाचा :
Weight Loss | आहारात सामील करा ‘हे’ सुपर फूड, झटक्यात कमी होईल वजन!#weightloss | #Superfood | #diet | #health https://t.co/BrMOQrwFEa
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021