प्रेम आंधळ असतं पण इतकं! जोडीदाराला किस करता येत नव्हतं म्हणून तिने…
काहीजण आपल्या आवडत्या व्यक्तीला जे आवडेल ते करतात अशा अनेक पद्धतींचा वापर करून कपल्स आपलं प्रेम व्यक्त करत असतात. पण एका तरुणीने बॉयफ्रेंड सोबत तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक धक्कादायक प्रकार केला आहे.
मुंबई : आजकाल प्रेमात लोकं काहीही करायला तयार असतात. ते म्हणतात ना प्रेमासाठी कायपण अगदी तसंच. सध्याचे कपल्स आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. काहीजण डेटवर घेऊन जातात, काहीजण आपल्या आवडत्या व्यक्तीला जे आवडेल ते करतात अशा अनेक पद्धतींचा वापर करून कपल्स आपलं प्रेम व्यक्त करत असतात. पण एका तरुणीने बॉयफ्रेंड सोबत तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक धक्कादायक प्रकार केला आहे.
एक 22 वर्षांची तरूणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सध्या ती तिच्या विचित्र दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तरूणीच्या म्हणण्यानुसार, तिनं तिच्या जिभेचा एक भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला आहे. कारण तो भाग बॉयफ्रेंड सोबत किस करताना स्मूच करण्याच्या क्षमतेवर परिणाम करत होता. म्हणून तिने चक्क जिभेचा एक भागच काढून टाकला आहे. तिनं केलेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, TikToker XEHLI G या तरूणीनं तिच्या जीभेखाली सापडलेला एक पडदा ज्याला लिंगुअल फ्रेन्युलम असं म्हणतात. तो जिभेचा भाग तिनं शस्त्रक्रियेद्वारे काढला आहे. याबाबत XEHLI G नं सांगितलं की, बॉयफ्रेंड सोबत स्मूच न केल्याने तिचा कॉनफिडन्स कमी झाला होता. त्यामुळे तिने जीभेचा तो भाग कापून घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे तरूणीनं सांगितले की, काही प्रकरणांमध्ये लिंगुअल फ्रेन्युलम हा भाग खूप लहान आणि घट्ट असतो. त्यामुळे लोकांना बोलण्यात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसंच याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या लव्ह लाईफवरही होऊ शकतो.
लिंगुअल फ्रेनुलम काढून टाकणे हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता. कारण प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. काहीजण एकमेकांना मिठी मारतात, काहीजण किस करतात. पण माझ्या जिभेच्या त्या भागामुळे मला स्मूचिंग करण्यात अडचण येत होती. म्हणून मी हा भाग काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं XEHLI G नं सांगितलं.