घरच्या घरी तयार करा ‘हा’ आयुर्वेदिक काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

| Updated on: Apr 11, 2021 | 11:24 AM

कोरोना विषाणूच्या (कोविड -19) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद आणि घरगुती उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.

घरच्या घरी तयार करा हा आयुर्वेदिक काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
काढा
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड -19) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद आणि घरगुती उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण देशामध्ये सध्या कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. काल महाराष्ट्रात 55 हजार 411 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. (Special tips for making Ayurvedic extract at home)

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

काढ्यासाठी लागणारे साहित्य

-तुळशीचे पाने

-दालचिनी

-सुंठ

-काळे मिरे

हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल. ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात.

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Special tips for making Ayurvedic extract at home)