पोटाची चरबी होईल कमी, ‘या’ मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
स्वयंपाकघरात जेवणात वापरले जाणारे मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर ते तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतात. काही मसाले असे आहेत ज्यांचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

आपल्या भारतीय घराघरांमध्ये मसालेदार जेवण खुप आवडीने सेवन करत असतात. प्रत्येक शहरात, गावात, राज्यात तुम्हाला एक अनोखी चव आणि पांरपारिक पदार्थ पाहायला मिळेल. कारण या सर्वांमध्ये जर काही सौम्य असेल तर ते मसाले आहेत. स्वयंपाक करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी प्रत्येक जेवणात वापरले जाणारे बहुतेक मसाले सारखेच असतात. काळी मिरीपासून ते लवंग तसेच प्रत्येक मसल्यात स्वत:चे औषधी गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवणे महत्वाचे आहे. त्यामुळे काही मसाल्यांचे पाणी तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. .
तुमचे वजन जास्त वाढत असेल तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच, केवळ तंदुरुस्त राहण्यासाठीच नव्हे तर निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यास कोणत्या मसाल्याचे पाणी शरीरासाठी उपयुक्त आहे ते आपण आजच्या लेखात जाणुन घेऊयात…
जिरे पाणी प्या
तुम्हाला जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असल्यास सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ग्लॅमरस आणि फिट राहण्यासाठी सुद्धा तुम्ही जिरे पाणीचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते उकळवा, गाळून घ्या आणि कोमट प्या.
मेथीच्या दाण्यांचे पाणी
सकाळी उठल्यानंतर मेथीच्या दाण्यांचे पाणी पिणे वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि त्वचा देखील चमकदार होते.
दालचिनीचे पाणी
वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दालचिनी चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. दालचिनी पाण्यात चांगले उकळा आणि घोट घोट करून प्या. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
बडीशेप पाणी
उन्हाळ्यात वजन नियंत्रित करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. हे तुमचे पचन निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा सकाळी आजारपणाची समस्या आहे त्यांच्यासाठीही बडीशेप पाणी फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)